Aai Bhadyane Hawi Saam tv
मनोरंजन बातम्या

Aai Bhadyane Hawi: आईच्या प्रेमाची वेगळी मांडणी; मातृदिनानिमित्त केदार शिंदेंच्या 'आई भाड्याने हवी?'ची घोषणा

Aai Bhadyane Hawi: मातृदिनानिमित्त दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘आई भाड्याने हवी?’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली. आईच्या भावनांवर आधारित हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shruti Vilas Kadam

मातृदिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी चाहत्यांना खास भेट दिली आहे. ‘आई भाड्याने हवी?’ असे त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव असून, या घोषणेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

केदार शिंदे यांनी मातृदिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली. “आज ‘Mother’s Day’... मातृदिन एका दिवसापुरता मर्यादित कसा असू शकतो? जी स्त्री आपल्याला नऊ महिने पोटात वाढवते, त्यानंतर आयुष्यभर आपला तळहाताच्या फोडासारखा सांभाळ करते, तिच्यासाठी फक्त एक दिवस पुरेसा कसा असेल? ३६५ दिवस Mother’s Day असायला हवा,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, “‘आई’ हा शब्द नाही, ती एक अलौकिक भावना आहे. ज्यांच्या घरात आई आहे त्यांना तिची जाणीव करून देण्यासाठी आणि ज्यांच्याकडे ती नाही, त्यांना त्या भावनेची उब समजावून सांगण्यासाठी हा सिनेमा घेऊन येत आहोत.”

या पोस्टसोबत त्यांनी ‘आई भाड्याने हवी?’ या चित्रपटाचे नाव जाहीर केले. शीर्षकच वेगळे आणि लक्षवेधी असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा सिनेमा विनोदी शैलीत असला तरी त्यामागे आईच्या ममतेची आणि नात्यांची भावनिक बाजू मांडली जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मीती केदार शिंदे यांची मुलगी अभिनेत्री सना शिंदे करत आहे.

अद्याप या सिनेमातील कलाकार किंवा प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, मातृदिनाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या या घोषणेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाच्या नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचा राजीनामा

Maharashtra News Live Update: लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 कोटी 38 लाख रुपयांचा अपहार

Pakistan Blast : पोलीस चौकीवरील हल्ल्यात 21 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

प्रसिद्ध गायिकेची निर्घृण हत्या; जंगलात आढळला जळालेला मृतदेह, चाहत्यांमध्ये खळबळ

Helmet Expiry Date Checking Tips: हेल्मेट किती वर्षे वापरावे? 'हे' आहेत हेल्मेट बदलण्याचे 3 महत्त्वाचे संकेत; आजच तपासा

SCROLL FOR NEXT