KBC 15 In Suhana Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suhana Khan Trolled: सुहाना खान अडखळली, शाहरुखबद्दल प्रश्न विचारताच उत्तरही देता येईना

KBC 15 In Suhana Khan: ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या टीमने KBC 15 मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी सुहाना खानला किंग खानबद्दल एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर तिने चुकीचं दिल्यामुळे सध्या ट्रोल होत आहे.

Chetan Bodke

KBC 15 In Suhana Khan

सध्या झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. बॉलिवूडच्या अनेक स्टारकिड्सने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ८ नोव्हेंबरला रिलीज झाला असून चित्रपटाची स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच सुहाना खानने आणि अगस्त्य नंदाने KBC 15 मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी सुहाना खानला तिच्या वडीलांबद्दल एका प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर तिने चुकीचं दिल्यामुळे सध्या ट्रोल होत आहे.

अमिताभ बच्चन यांनी KBC 15 मध्ये सुहाना खानला किंग खानविषयी एक प्रश्न विचारला. ‘शाहरुख खानला खालीलपैकी कोणता पुरस्कार आतापर्यंत मिळालेला नाही?’ अस त्यांनी प्रश्न विचारला. A. पद्मश्री B.लेजन ऑफ ऑनर C. L'Etoile d'Or D. Volpi Cup. असे हे चार पर्याय होते. या प्रश्नाचं उत्तर सुहाना खानने A. पद्मश्री असं दिलं. तिच्या ह्या उत्तरामुळे तिला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केलं. बापाबद्दल लेकीला माहित नसल्यामुळे बिग बींसह सर्वच तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. या प्रश्नाचं बरोबर उत्तर D. Volpi Cup असं आहे.

शोमध्ये बिग बी सुहानाला म्हणले, 'वडिलांना कोणता पुरस्कार मिळाला आहे, हे मुलीला माहित नाही? तुला इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.' सुहानाच्या चुकीच्या उत्तरानंतर अमिताभ बच्चन यांनी सुहानाला २००५ मध्ये शाहरुख खानला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असं सांगितलं. गेमच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांनी सुहानाला ‘तुला वडीलांनी इकडे येण्याआधी काय सल्ला दिला?’, असा प्रश्न विचारला. ‘पप्पांनी सांगितलं, तुम्ही त्यांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे, त्यामुळे मला सोपे प्रश्न विचारा.’ असं तिने उत्तर दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं खातं उघडलं, एकाच प्रभागातील ४ उमेदवार विजयी

Municipal Elections Result: पुण्यात मतमोजणी केंद्रावर गोंधळ, EVM मशीन बदलल्याचा ठोंबरेंचा आरोप, पोलिसांसोबत अरेरावी

Pune Mahanagar Palika Nivadnuk nikal : पुण्याचा दादा कोण? पहिला निकाल आला हाती, ३ जागांवर एकाच पार्टीचा विजय, भाजपचा पराभव

Neer Dosa Recipe : नाश्त्याला बनवा कुरकुरीत तांदूळ अन् ओले खोबरे घालून नीर डोसा, नोट करा रेसिपी

केंद्रीय मंत्र्यांचा निकटवर्तीय विजयाच्या उंबरठ्यावर, कुख्यात गुंड असलेल्या उमेदवारानं जेलमधून लढवली निवडणूक|VIDEO

SCROLL FOR NEXT