KBC 16 Saam Tv
मनोरंजन बातम्या

KBC 16 : महाभारतातील फक्त एका प्रश्नाचं उत्तर आलं नाही, स्पर्धकानं २५ लाख गमावले

Kaun Banega Crorepati 2024 : कौन बनेगा करोडपतीचं नवं पर्व सुरू झालंय. यात एका स्पर्धकाला २५ लाख रुपये गमवावे लागले आहेत. कारण त्याला महाभारतासंबंधित एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.

Chetan Bodke

कौन बनेगा करोडपतीचं नवं पर्व सुरू झालंय. यात एका स्पर्धकाला २५ लाख रुपये गमवावे लागले आहेत. कारण त्याला महाभारतासंबंधित एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.

कौन बनेगा करोडपतीचं १६ वे पर्व सुरू झाले आहे. १२ तारखेपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रीमिअरमध्ये अमिताभ बच्चन भावुक झाले होते. या पर्वाची उत्साहात सुरुवात झाली आहे. पहिल्याच भागात आलेल्या स्पर्धकानं अवघे ३ लाख २० हजार रुपये जिंकले. पण त्याला २५ लाख रुपये जिंकण्याची संधी होती. पण एका प्रश्नाचं उत्तर न आल्यानं ती संधी गमावली.

पहिलाच स्पर्धक अन् पहिलीच चूक

'कौन बनेगा करोडपती'चं सोळावं पर्व सुरू झालं. अमिताभ बच्चन यांचं भावुक भाषण सर्वांनाच भावलं. बच्चन यांच्या खास शैलीत त्यांनी शोची सुरुवात केली. प्रेक्षकांनीही जबरदस्त दाद दिली.

'आज नवीन हंगामाची सुरुवात आहे. पण आज माझ्याकडे शब्द नाहीत. कारण तुमच्या प्रेमाबद्दल मी आभार व्यक्त करू शकत नाही. शो सुरु करून बिग बी यांनी स्पर्धकांची ओळख करून दिली. 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' फेरीनंतर गुजरातमधील प्रोफेशनल एचआर उत्कर्षला हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली.

उत्कर्ष क्वीझ चांगला खेळला. पण महाभारताशी संबंधित त्याला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर, तो २५ लाख रुपये जिंकू शकला असता. पण त्याचं उत्तर देता आलं नाही.

नेमका प्रश्न काय होता?

महाभारतानुसार, कोणत्या देवतेनं अंबाला माळ भेट दिली होती आणि ही माळ घालणारा भीष्माचा वध करेल, असं सांगितलं होतं?

उत्तरांसाठी चार पर्याय देण्यात आले होते.

भगवान शिव

भगवान कार्तिकेय

भगवान इंद्र

भगवान वायू

या प्रश्नावर उत्कर्ष गोंधळून गेला. त्यानं दोन लाइफलाइन वापरल्या होत्या. पहिल्यांदा त्यानं भगवान शिव असं उत्तर दिलं. प्रत्यक्षात ते उत्तर चुकलं. मग त्याने भगवान वायूचा पर्याय निवडला. तोही चुकीचा होता आणि त्याने २५ लाख रुपये जिंकण्याची संधी गमावली. यामुळे त्याला शोचा निरोप घ्यावा लागला. या प्रश्नाचे अचूक उत्तर भगवान कर्तिकेय होते. या एका चुकीमुळं उत्कर्षला फक्त ३. २० लाख जिंकता आले आणि त्याच्या केबीसीतील प्रवास संपुष्टात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT