Akshara, Adhipati And Bhuvaneshwari Instagram @kavitamedhekar
मनोरंजन बातम्या

HBD Shivani Rangole: ऑनस्क्रीन सासूची सूनेसाठी वाढदिवशी खास पोस्ट; 'तुझ्याशी वाईट वागले तरी...' म्हणत भुवनेश्वरीने अक्षराला दिल्या शुभेच्छा

Tula Shikvin Changlach Dhada: अभिनेत्री कविता मेढेकर आणि शिवानी रांगोळे 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

Pooja Dange

Tula Shikvin Changlach Dhada Actress Post:

अभिनेत्री कविता मेढेकर आणि शिवानी रांगोळे 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. कविता मेढेकर, भुवनेश्वरी तर शिवानी रांगोळे, अक्षरा हे पात्र साकारत आहेत. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे.

या ऑनस्क्रीन सासूबाईने आपल्या सुनेसाठी एक खास पोस्ट केली आहे. शिवानी रांगोळेच्या वाढदिवशी कविता मेढेकर यांनी तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कविता मेढेकर पोस्ट

कविता मेढेकरने शिवानी रांगोळेसोबतचे सेल्फी शेअर केले आहेत. पहिला फोटो अक्षरा आणि अधिपती यांच्या साखरपुड्या दरम्यानचा आहे. तर दुसरा फोटो अधिपतीला काढला असून या फोटोमध्ये मालिकेतील तिन्ही मुख्य कलाकार आहेत.

'स्क्रीनवर मी तुझ्याशी कीतीही वाईट वागले तरीही तुला माहितीये प्रत्यक्ष आयुष्यात माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आहेस तशीच चांगली मुलगी राहा. स्टे focused, स्टे happy!! And let’s rock “तुला शिकवीन चांगलाच धडा’’ वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा शिवानी' असे कॅप्शन देत भुवनेश्वरी म्हणजे कविता मेढेकर यांनी अक्षराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवणी रांगोळेचा नवरा विराजस कुलकर्णीने देखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. लग्नातील फोटो पोस्ट करत विराजसने लिहिले आहे की, 'हॅपी बर्थडे बायको... तुझा हा वेडेपणा वर्षानुवर्षे असाच राहू दे. लव्ह यू'

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ट्विस्ट

अक्षर आणि अधिपती यांचे लग्न झाल्यानंतर मालिकेत (Serial) आता नवा ट्विस्ट येणार आहे. अक्षरा शिक्षण संमेलनासाठी गेली आहे. या शिक्षण संमेलनात कमल अक्षराचा अपमान करते. ही बाई शिक्षणाचे गोडवे गते पण फक्त पैशासाठी तिने एका अशिक्षित घरात लग्न केलं आहे. अडाणी नवऱ्याची बायको शिक्षण संमेलनात येऊन शिक्षणाचे गोडवे गाणार, असं म्हणत कमलने अक्षराचा पाणउतारा केला.

तर दुसरीकडे अक्षरा आता शाळेची मालकीण असल्याने तिने शाळेत शिकवू नये यावर भुवनेश्वरी ठाम असते. पण अधिपती भुवनेश्वरीला समजावतो आणि भुवनेश्वरीकडून अक्षरासाठी शाळेत शिकविण्याची परवानगी घेतो. मात्र भुवनेश्वरी अक्षरासमोर एक अट ठेवते. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

संतापजनक! रूम रिकामी ठेवू पण मराठी लोकांना देणार नाही; मुंबईमध्ये शिंदे कुटुंबाला घर नाकारलं

Shocking: खाताना कुरकुरेचा तुकडा श्वसननलिकेत अडकला, तरुणाचा तडफडून मृत्यू

Rajasthan Sandstorm viral Video : भरदिवसा पडला रात्रीसारखा अंधार; थरकाप उडवणारं रेतीचं वादळ, VIDEO व्हायरल

Brain Stroke Symptom: हाता-पायाला सतत मुंग्या येतात? होऊ शकत ब्रेन स्ट्रोकचं कारण, जाणून घ्या लक्षणे

SCROLL FOR NEXT