Katrina Kaif Viral Video Instagram @katrinakaif
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif: कतरिना कैफ पापाराझींवर संतापली, म्हणाली 'आमचे खासगी आयुष्य...'

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ राग झाला अनावर, कॅमेराच करायला सांगितला बंद.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Katrina Kaif Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिला आपण नेहमी शांत आणि छान मूडमध्ये पहिले आहे. चाहत्यांपासून ते पापाराझींपर्यंत सगळ्यांशी ती खूप प्रेमाने बोलते. पण अलीकडेच या अभिनेत्रीला पापाराझींचा इतका राग आला की तिने गाडीतून खाली उतरून 'तुमचा कॅमेरा खाली ठेवा' असे म्हटले. कतरिनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

या व्हिडिओमध्ये कतरिना कैफ आधी कारमध्ये बसलेली दिसते, परंतु पापाराझी तिचे नाव घेतात आणि तिचा फोटो क्लिक करण्यासाठी पुढे येतात तेव्हा तिला राग येतो. आमचेही वैयक्तिक जग आहे, असे कतरिनाने म्हणते. ती गाडीतून खाली उतरू लागताच पपांनी तिचा फोटो क्लिक करायला सुरुवात केली. कतरिनाला हे आवडले नाही. ती रागाने म्हणाला, 'तुम्ही लोक कॅमेरा खाली ठेवा, आम्ही इथे जिम करायला आलो आहोत. तुम्ही लोकांनी असे केले तर… खाली ठेवा, असे कतरिना म्हणाली. (Celebrity)

कतरिनाची प्रायव्हसी लक्षात घेऊन पापाराझींनी लगेच कॅमेरे खाली ठेवले आणि माफी मागितली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक लोक कतरिना कैफच्या प्रेगन्सीबद्दल बोलत आहेत. कॅटच्या प्रेगन्सीविषयी अनेकदा अफवा पसरल्या आहेत. (Social Media)

कतरिनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. टराग आला तर आरामात कॅमेरा बंद करायला सांगायचं, रागवायची काय गरज होतीट अशा कमेंट लोक करत आहेत.

कतरिना कैफ सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत 'फोन भूत' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. कतरिना कैफ सलमान खानसोबत 'टायगर 3'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती 'मेरी ख्रिसमस'मध्येही दिसणार आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! दूधात तेल आणि चुना? तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध ? आमदारांनी डेमो दाखवला...कारवाई कधी?

Aeroplane Etiquette: टूथपेस्ट ते परफ्यूम... विमानात पायलटला कोणत्या गोष्टी नेण्यास बंदी असते?

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचा आठवावा प्रताप! छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना UNESCO World Heritage दर्जा

Night Sleeping Time: रात्री किती वाजता झोपलं पाहिजे? योग्य वेळ जाणून घ्या

ठाकरेंच्या डरकाळीनंतर अमराठी व्यापाऱ्यांची मराठी शिकण्यास सुरूवात | VIDEO

SCROLL FOR NEXT