Merry Christmas Movie Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif: कतरिना कैफच्या 'मेरी ख्रिसमस' चित्रपटची तारीख पुढे ढकलली, निर्मात्यांना वाटतेय भीती

'मेरी ख्रिसमस'कडे सगळ्यांचे लक्ष जावे आणि त्याची कमाई वाढावी यासाठी निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Merry Christmas Movie Update: कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट त्याच्या निश्चित तारखेला प्रदर्शित होणार नाही. 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट यावर्षी 23 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. निर्मात्यांनी आता हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख लवकरच सांगू असे जाहीर केले आहे. म्हणजेच 'मेरी ख्रिसमस'ची बॉक्स ऑफिसवर टायगर श्रॉफच्या 'गणपत' आणि रणवीर सिंगच्या 'सर्कस'शी टक्कर होणार नाही. (Katrina Kaif)

'मेरी ख्रिसमस'सह आणखी दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. निर्मात्यांनी ‘प्रचंड स्पर्धा’ टाळण्यासाठी प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. सुरुवातीला 'मेरी ख्रिसमस' 23 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, पण त्याच दिवशी 'गणपत' आणि 'सर्कस' प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर ती जबरदस्त लढत असेल. अशा वेळी प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी चित्रपटाला प्रचंड स्पर्धेला सामोरे जावे लागेल. 'मेरी ख्रिसमस'कडे सगळ्यांचे लक्ष जावे आणि त्याची कमाई वाढावी यासाठी निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Movie)

श्रीराम राघवन दिग्दर्शित मेरी ख्रिसमस, अनुकृती पांडे आणि श्रीराम राघवन यांनी एकत्रित लिहिला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच कतरिना कैफ आणि विजय सेतुपती एकत्र काम करणार आहेत. या दोन्ही कलाकारांचा राघवनसोबतचा हा पहिला चित्रपट आहे. कतरिना आणि विजय सेतुपती यांच्याशिवाय या चित्रपटात संजय कपूर, विनय पाठक, टिन्नू आनंद, प्रतिमा काझमी, षणमुगराजन, केविन जय बाबू आणि राधिका सरथकुमार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मेरी ख्रिसमसची निर्मिती रमेश तौरानी यांच्या टिप्स इंडस्ट्रीज आणि मॅचबॉक्स पिक्चर्स प्रा.लि.च्या सहकार्याने केली आहे. (Bollywood)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT