कतरिना-विकीच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी 'या' अटी Saam Tv
मनोरंजन बातम्या

कतरिना-विकीच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी 'या' अटी

अटी ऐकून थक्क व्हाल!

Shivani Tichkule

मुंबई - कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) या दोघांचे लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. असे असले तरी या दोघांनीही आतापर्यंत लग्नाबाबतच्या कोणत्याही बातमीला दुजोरा दिलेला नाही. असे असले तरी कतरिना आणि विकी डिसेंबरमध्ये शाही विवाह करणार अशी जोरदार चर्चा आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, या दोघांचे लग्न 7-10 डिसेंबरला राजस्थान या ठिकाणी होणार आहे.

हे देखील पहा -

कतरिना आणि विकीच्या लग्नासंबंधित रोज नवीन माहिती समोर येत आहे. त्यात आता या दोघांच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, लग्नात पाहुण्यांना मोबाईल फोन वापरण्याची परवानगी नसणार आहे. याचं कारण म्हणजे त्यांना लग्नातील फोटो लीक होण्याची भीती आहे. दुसरी अट, पाहुण्यांना नॉन डिस्क्लोजर अॅग्रीमेंट मान्य करावे लागणार आहे ज्यामध्ये पाहुण्यांना लग्नासंबिंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही. लग्नासाठी आमंत्रित पाहुण्यांना एक सीक्रेट कोड देण्यात येतील. हे सीक्रेट कोड कतरिना आणि विकीच्या नावाशी संबंधित असल्याची माहिती आली आहे. या विवाह सोहळ्यासाठी मोजक्या लोकांना आमंत्रण देण्यात आल्यामुळे त्यांचा काही मित्रपरिवार दु:खी असल्याचे देखील बोलले जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : विदर्भात तापमानाचा पारा 46 पार...

Weather Alert: ५ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे! पुणे-कोकणात वादळी पाऊस तर विदर्भात तीव्र उष्णतेची लाट; तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

भक्ती-संस्कृतीचा अनोखा संगम; दुर्गा काली माता देवीला ६० डझन आंब्यांचे आरास

पार्लरमध्ये जायची गरज नाही, घरच्या घरी मिळवा काचेसारखी चमकदार त्वचा! दररोज फॉलो करा 'ग्लास स्किन' केअर रुटीन

Political News : भाजप नेते निरंजन डावखरेंच्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, ठाण्याच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT