Kartik Aaryan Watch Gadar 2 Instagram @kartikaaryan
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan Share Gadar 2 Video: फॅनबॉय कार्तिक आर्यनने प्रेक्षकांसोबत पाहिला 'गदर २': आयकॉनिक सीन पाहून दिली प्रतिक्रिया

Kartik Aaryan: 'गदर 2' पाहिल्यानंतर कार्तिक आर्यन सनी देओलचा चाहता झाला.

Pooja Dange

Kartik Aaryan Watch Gadar 2:

कार्तिक आर्यनने १५ ऑगस्टला गेटी गॅलेक्सी येथे प्रेक्षकांसोबत सनी देओलचा 'गदर २' पाहिला. कार्तिक आर्यन, सनी देओलचा चाहता झाला असून, तो त्याचे भरभरून कौतुक करत आहे. कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर 'गदर 2' मधील हँडपंप सीनची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे.

गदर 2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. स्वातंत्र्य दिनादिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट पहिला भारतीय चित्रपट ठरला.

चित्रपटाने ६ दिवसांत २६३.४८ कोटींची कमाई केली. जो कोणी 'गदर 2' बघेल , तो चित्रपटाचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही. तारा आणि सकिना यांचे नाव सर्वांच्या तोंडावर आहे. कार्तिक आर्यनची अवस्थाही अशीच होती.

कार्तिकने शेअर केला हँडपंप सीन

'गदर 2' पाहिल्यानंतर कार्तिक आर्यन सनी देओलचा चाहता झाला. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'गदर 2' चा हँडपंप सीन शेअर केला आणि लिहिले, 'हा सीन आयकॉनिक आहे. माझ्या आतील फॅनबॉय तारा सिंग (सनी देओल)साठी ओरडतोय.'

कार्तिक आर्यनच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 'गदर २' मधील अभिनेत्री सिमरत कौरने कार्तिकच्या या पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे, भारताने हा सीन पुन्हा पाहण्यासाठी २२ वर्षे वाट पाहिली आहे.

'गदर 2' ने 15 ऑगस्टला विक्रमी कमाई केली

'गदर 2'चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. 22 वर्षांपूर्वीच्या 'गदर'ने अनेक विक्रम मोडले.

'गदर 2'नेही अनेक विक्रम केले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 40.1 कोटी रुपयांची कमाई केली होती, परंतु 15 ऑगस्ट रोजी हा विक्रम मोडला गेला. चित्रपटाने 55.4 कोटींची कमाई करून इतिहास रचला.

'गदर 2' मध्ये अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, मनीष वाधवा, लव सिन्हा आणि गौरव चोप्रा यांच्याही भूमिका आहेत. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: समिती कसला अभ्यास करणार? कर्जमाफीवरून ठाकरे आक्रमक

Gold Rate : ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त, चांदीचा भावही घसरला; वाचा २२ कॅरेट-२४ कॅरेटचे आजचे दर

Electricity Bill: वीज बिलात ऐतिहासिक कपात, सर्वसामान्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या किती फायदा होणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेची डोकेदुखी वाढली; शिंदेसेनेचे 2 नेते अडचणीत, पालिका निवडणुकीत फटका बसणार?

Bollywood Famous Actor : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे तरुण अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध; पत्नीने केली हेरगिरी, गुप्तहेराचा खुलासा

SCROLL FOR NEXT