Kartik Aaryan On His Love Life  Instagram @kartikaaryan
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan On Love : कार्तिक आर्यन मिळालं खरं प्रेम ? खुद्द अभिनेत्याने केला खुलासा

Kartik Aaryan Post On Twitter: कार्तिकने त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर आस्क मी एनीथिंग सेशन आयोजित केले होते.

Pooja Dange

Kartik Aaryan Spoke about Love in His Life : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनची तुफान क्रेझ आहे. कार्तिकच्या चित्रपटांची प्रेक्षक आणि त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. कार्तिक आर्यनचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कार्तिक त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर अलीकडेच कार्तिकने त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर आस्क मी एनीथिंग सेशन आयोजित केले होते. यावेळी कार्तिकने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. (Latest Entertainment News)

ट्विटरवर आस्क मी एनीथिंग सेशनदरम्यान, कार्तिक आर्यनला एका चाहत्याने विचारले, तुला खरे प्रेम कधी मिळाले आहे का? यावर उत्तर देताना कार्तिकने अचूक प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला- मला वाटलं होत प्रेम मिळालं आहे, पण मी प्रेमात कमनशिबी ठरलो. याशिवाय चाहत्यांनी कार्तिक आर्यनला प्रेम आणि लग्नाबाबत अनेक प्रश्न विचारले, ज्याला कार्तिकने गंमतीशीर उत्तर दिले.

एका नेटकाऱ्याने त्याला विचारले की तुम्ही अरेंज मॅरिज करणार की लव्ह मॅरिज. माला आंटींकडे अनेक लग्नाचे प्रस्ताव येत असती. यावर उत्तर देताना कार्तिक म्हणाला, मी प्रेमाने अरेंज्ड मॅरेज करेन.

या प्रश्नासंदर्भात आणखी एका नेटकाऱ्याने कार्तिकला आणखी एक प्रश्न केला. नेटकाऱ्याने कार्तिकला विचारले, तुझे लग्न कधी होणार आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना कार्तिक म्हणाला – घोडी, ठिकाण, मेनू, सर्व काही तयार आहे. पण आधी नवरी तरी मिळू दे .

कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विध्वंश करत आहेत. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट असून यात कार्तिक आर्यनसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटात गजराज राव, रितू शिवपुरी आणि सुप्रिया पाठक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 29 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT