Kartik Aaryan On His Love Life  Instagram @kartikaaryan
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan Marriage: ऑस्ट्रेलियात कार्तिक आर्यनचे स्वयंवर; फॅनच्या प्रश्नावर अभिनेत्याची क्युट रिअ‍ॅक्शन

Kartik Aaryan Gets Marriage Proposal : फॅनने लग्नासाठी विचारताच कार्तिक आर्यन अक्षरश: लाजून लाल झाल होता.

Pooja Dange

Kartik Aaryan Blushes After Getting Proposed:

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा कार्तिक आर्यनने नेहमीच त्याच्या अभिनयासह स्वभावाने देखील प्रेक्षकांची मने जिंकतो.

सध्या कार्तिक आर्यन इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियात गेला आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' तिथे दाखविण्यात आला.

कार्तिक आर्यन नेहमीप्रमाणे स्वेटशर्ट आणि मेसी हेअरमध्ये कार्तिक थिएटरमध्ये गेला. कार्तिक आर्यनने थिएटरमध्ये एंट्री करताच एकच जल्लोष झाला. त्यानंतर तिथे उपस्थित प्रेकक्षकांनी कार्तिक आर्यनला अनेक प्रश्न विचारले.

दरम्यान एक चाहतीने कार्तिक आर्यन चक्क लागणीची मागणी घातली. कार्तिकच्या फॅनने त्याला विचारले की, 'मला हा प्रश्न विचारण्याची संधी पुन्हा कधी मिळणार नाही. म्हणून आताच विचारते, तू माझ्याशी लग्न करशील का?'

तिने हा प्रश्न विचारल्यानंतर कार्तिक आर्यन अक्षरश: लाजून लाल झाल होता. त्याच्या चेहऱ्यावर तो ब्लश करत आहे हे दिसत होते. त्यावर कार्तिक म्हणाला, 'एकजण प्रेमकथेविषयी तर दुसरी लग्नाविषया विचारत आहे. हे काय घडतय माझ्यासोबत? माझं स्वयंवर आहे असं वाटतय मला.

मेलबर्नमध्ये माझं भारी स्वागत झालं आहे. पण... मी कसं बोलू हे कॅमेऱ्यासमोर तुला. पण मी तुला हग करू शकतो.' कार्तिक आर्यन हे सगळं बोलताना खुप लाजत होता. त्याचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. (Latest Entertainment News)

कार्तिकला या फिल्म फेस्टिवलमध्ये व्हिक्टोरिया गव्हर्नरकडून त्याच्या कामगिरीसाठी 'द रायझिंग ग्लोबल सुपरस्टार ऑफ इंडियन सिनेमा' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंडविषयी बोलायचे झाले तर, कार्तिक कबीर खान यांचा चित्रपट 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसणार आहे. त्यानंतर हंसल मेहता यांच्या कॅप्टन इंडिया आणि अनुराग बासूच्या 'आशिकी 3'मध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Disease Symptoms: डोळ्यातून पाणी अन् त्वचेत बदल जाणवतोय? असू शकतात किडनी फेल्युअरची लक्षणे, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Shocking News : आईच्या मृतदेहासोबत बंद खोलीत कोंडून घेतलं, १३ वर्ष घराबाहेर पडला नाही, नेमकं काय प्रकरण

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT