Sun Sajini Song Release Saam Tv
मनोरंजन बातम्या

Satyaprem Ki Katha New Song Released: 'सत्यप्रेम की कथा'चित्रपटातील नवं गाणं रिलीज, 'सुन सजनी'मध्ये कार्तिक-कियाराने लावले जबरदस्त ठुमके

Sun Sajini Song Release: अवघ्या काही तासांमध्येच या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Priya More

Kartik Aryan And Kiara Advani Song: बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळख असलेला अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट कथा आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी लागलेल्या खर्चामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढत चालली असून ते हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये या चित्रपटातील नवीन गाणं रिलीज झाले आहे. अवघ्या काही तासांमध्येच या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'सत्यप्रेम की कथा' हा रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटातील कियारा आणि कार्तिकची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या चित्रपटाचे नुकताच रिलीज झालेल्या सुन सजनी या गाण्यामध्ये कियारा आणि कार्तिक यांनी गुजराती लूकमध्ये दिसत आहे. कियाराने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला असून यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. कार्तिक देखील गुजराती पेहरावामध्ये दिसत आहे. दोघांनीही या गाण्यात जबरदस्त ठुमके लावले आहेत.

सुन सजनी या गाण्यात कार्तिक आणि कियारा दोघेही गरबा डान्स करताना दिसत आहे. दोघांनी दांडिया खेळल्याचे देखील या गाण्यामध्ये दिसत आहे. या गाण्यामधील दोघांची केमिस्ट्रीही खूपच धमाल होती. हे गाणे येताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहे. प्रेक्षकांकडून या गाण्याला खूपच चांगली पसंती मिळताना दिसत आहे. अवघ्या काही तासांमध्येच या गाण्याला खूपच चांगले व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात कियारा अडवाणीला पाहिल्यानंतर लोकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

कियारा आणि कार्तिक या चित्रपटाच्या माध्यमातून दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहे. याआधी दोघेही 'भूल भुलैया 2' चित्रपटामध्ये दिसले होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. कार्तिक आणि कियारा यांची जोडी हिट ठरली आहे. आता 'सत्यप्रेमची कथा' या चित्रपटाच्या माध्यमातून ते पुन्हा भेटीला येणार असल्यामुळे त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत. हा चित्रपट 29 जून रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT