Karthi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Karthi: कार्थीचे फेसबुक अकाऊंट हॅक, ट्विट करत दिली माहिती...

कार्थीचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याने तो चर्चेत आला आहे. त्याचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Karthi Facebook Account Hack: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घालत आहे. त्यातील एक चित्रपट म्हणजे, 'पॉन्नियन सेल्वन'. कार्थीने या चित्रपटात मुख्य भूमिका साकरली होती. कार्थीला नेहमीच सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी आणि त्याच्या उत्तमोत्तम अभिनयासाठी ओळखले जाते.

नुकताच तो एका विषयामुळे बराच चर्चेत आला आहे. त्याचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याने तो चर्चेत आला आहे. त्याचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ही माहिती स्वत: कार्थीने त्याच्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर केली आहे. कार्थी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो फेसबुकच्या माध्यमातून बऱ्याच विविध पोस्ट शेअर करत असतो. कार्थीने सकाळी फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली होती.

काही वेळेपुर्वीच त्याने त्याचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात तो म्हणतो, "नमस्कार मित्रांनो, माझे फेसबुक पेज हॅक झाले आहे. आम्ही ते पुन्हा रिस्टोअर करण्याचा प्रयत्न करत आहोत." कार्थीचे हे ट्वीट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. त्याचे अनेक चाहते त्यावर कमेंट करताना दिसत आहे.

अभिनेता कार्थीसाठी 2022 हे वर्ष खूप महत्त्वाचे ठरले. विशेषत: गेले काही महिने तो व्यावसायिक आघाडीवर दिसत होता. या वर्षात कार्थी 'पोन्नियन सेल्वन' आणि 'सरदार' दोन चित्रपटांनी चांगलाच चर्चेत आला होता. मनिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नियन सेल्वन' ३० सप्टेंबरला प्रदर्शित झाला असून चित्रपटाने अनेक कोटींची कमाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT