Kartik Aaryan Saam Tv
मनोरंजन बातम्या

बॉलिवूड गाजवणाऱ्या कार्तिक आर्यननं सांगितला तो 'वाईट' काळ, 'थर्ड हँड कार...'

'प्यार का पंचनामा' हा चित्रपट हिट झाल्यानंतरही कार्तिक रेड कार्पेट इव्हेंटमध्ये रिक्षा करून येत होता कारण...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - भूल भुलैया 2 पासून अभिनेता कार्तिक आर्यनला सुपरस्टारचा टॅग देण्यात आला आहे. त्याचा भूल भुलैया 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. या चित्रपटाने इतर चित्रपटांच्या मानाने खूप चांगली कमाई केली. कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan)आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इण्डस्ट्रीमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. आज कार्तिकचे लाखो चाहते आहेत. मात्र, हे सर्व कष्टाशिवाय शक्य नाही.अलीकडेच, अभिनेत्याने (Actor) एक जुना किस्सा शेअर केला आहे. 'प्यार का पंचनामा' हा चित्रपट हिट झाल्यानंतरही कार्तिक रेड कार्पेट इव्हेंटमध्ये रिक्षा करून येत होता कारण त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते.

हे देखील पाहा -

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक म्हणाला की, 'जेव्हा मी पहिल्यांदा इंडस्ट्रीत आलो तेव्हा माझ्याकडे कार नव्हती. दोन चित्रपट केल्यानंतर मी पहिली गाडी खरेदी केली. ती पण एक थर्ड हँड कार होती ज्याची किंमत ६० हजार रुपये होती. ते विकत घेतानाही मला खूप अडचणींचा सामना करावा लागला. पण त्या गाडीच्या दरवाज्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. मी ती गाडी खासकरून रेड कार्पेटवर जाण्यासाठी घेतली होती.

पण मला तिची सिस्टीम लवकर समजली नाही. मला दरवाजा उघडायला खूप वेळ लागला. हा संघर्ष नाही तर मजेदार आहे म्हणूनच मी हे सांगत आहे. माझ्याकडे ड्रायव्हर नव्हता, मी स्वतः गाडी चालवत असे. मी विशेषत: कार घेतली कारण जेव्हा मी रेड कार्पेट इव्हेंटमध्ये जायचो तेव्हा मी ऑटोने जायचो किंवा कोणाकडून लिफ्ट घ्यायचो किंवा कुणासोबत बाईकवर जात होतो.

कार्तिकने सांगितले की त्याच्या कारमध्ये लिकेजची समस्या देखील होती. याबद्दल अभिनेता म्हणाला, 'त्या गाडीमध्ये लिकेजची समस्या देखील होती आणि पावसात त्यात पाणी टपकायचे. पाणी वरच्या बाजूला जमा व्हायचे आणिड्रायवरची सीट ओली होत होती. त्यामुळे गाडी चालवताना ते पाणी माझ्या अंगावर पडायचे. पण नंतर मला त्याची सवय झाली. कोणाकडून तरी लिफ्ट घेण्यापेक्षा हे बरे वाटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT