Karishma Kapoor Net Worth Instagram @therealkarismakapoor
मनोरंजन बातम्या

Karishma Kapoor Net Worth : चित्रपटांपासून दूर असलेली करिश्मा आहे गर्भश्रीमंत ; संपत्ती ऐकून शॉक व्हाल!

Karisma Kapoor's Birthday : करिश्मा चित्रपटांपासून दूर असली तरी तिच्याकडे अमाप संपत्तीची आहे.

Pooja Dange

Karishma Kapoor Birthday Special : चित्रपटसृष्टीतील कुटुंबांपैकी एक म्हणजे दिग्गज कपूर कुटुंब. कपूर कुटुंबातील सदस्य केवळ अभिनयात नाहीत तर दिग्दर्शन क्षेत्रात देखील आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत मुलगी काम करणार नाही, अशी परंपरा कपूर कुटुंबात होती आणि ही परंपरा राज कपूरच्या मुलींनीही पाळली. पण एका मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन चित्रपट विश्वात आपले नाव कमावले आणि ती म्हणजे करिश्मा कपूर.

फिल्मी बॅकग्राउंड असलेल्या करिश्मा कपूरचे लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचे स्वप्न होते. तिचे बालपण चित्रपटाच्या सेट आणि अवॉर्ड फंक्शन्समध्ये गेले. करिश्मा ही कपूर कुटुंबातील पहिली व्यक्ती होती जिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला.

कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिने तिची स्वप्ने निवडली आणि आई बबिता यांनी मुलीला पाठिंबा दिला. करिश्माने शिक्षण सोडल्यानंतर वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी 'प्रेम कैदी'मधून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. (Latest Entertainment News)

करिश्मा कपूरला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी समीक्षकांकडून भरपूर प्रशंसा मिळाली. करिश्मा रातोरात स्टार झाली होती. परंतु तिच्यासाठी हे सगळं सोप नव्हतं. 'प्रेम कैदी' नंतर, करिश्मा कपूरचे बॅक टू बॅक 5 चित्रपट फ्लॉप झाले.

सलमान खानसोबतचा 'जागृती' आणि 'निश्चय', अक्षय कुमारसोबतचा 'दीदार' या चित्रपटांचा तिच्या फ्लॉप चित्रपटांमध्ये समावेश आहे. मात्र, करिश्माने हार मानली नाही. तिने खूप मेहनत केली आणि 'जिगर' (1992) या हिट चित्रपटाने तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. एका वर्षानंतर ती आणखी एका सुपरहिट चित्रपटामध्ये दिसली, तो चित्रपट म्हणजे 'अनाडी'.

करिश्मा कपूरने तिच्या करिअरमध्ये 'राजा बाबू', 'आशिक', 'फिजा', 'हम साथ साथ हैं', 'हसीना मान जाएंगी', 'दिल तो पागल है', 'हीरो नंबर' 'राजा हिंदुस्तानी' आणि 'जीत'यासह 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Movie)

करिश्मा कपूर 'डेंजरस इश्क' (2012) या चित्रपटात शेवटची दिसली होती. त्यानंतर ती फिल्मी जगतापासून दूर झाली. तसे असले तरी ती कायम चर्चेत असते. करिश्माने 2016 मध्ये संजय कपूरसोबत घटस्फोट घेतला, तेव्हापासून ती समायरा आणि कियान या तिच्या मुलांचे एकटीने संगोपन करत आहे.

करिश्मा चित्रपटांपासून दूर असली तरी तिच्याकडे अमाप संपत्तीची आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूरची संपत्ती 12 मिलियन डॉलर म्हणजेच 87 कोटी रुपये आहे. जाहिरात आणि मॉडेलिंग हे तिच्या उत्पन्नाचे साधन आहेत.

एवढेच नाही तर ती एका मोठ्या ब्रँडची अॅम्बेसेडर देखील आहे. ती Babyoye कंपनीची शेअरहोल्डर आहे आणि अनेक धर्मादाय संस्थांसोबत काम करते. यासोबतच ती टीव्ही शोचे परीक्षण देखील करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT