Karishma Kapoor Spotted With Ex-Husband Instagram @yogenshah_s
मनोरंजन बातम्या

Karishma-Sanjay Kapoor Dinner Date: Ex-Husband सोबत स्पॉट झाली करिष्मा कपूर; नेटकऱ्यांना आठवले संजय कपूरवर केले गंभीर आरोप

Karishma Kapoor Spotted With Ex-Husband : रिष्मा-संजय यांनी डिनर डेटवर स्पॉट करण्यात आले आहे.

Pooja Dange

Karishma Kapoor - Sanjay Kapoor Dinner Date: अभिनेत्री करिष्मा कपूरचे २०१३ साली बिजनेसमॅन संजय कपूरशी लग्न झाले होते. परंतु तिला वैवाहिक जीवनात खूप त्रास झाला असल्याचे तिने सांगितले आहे. संजय कपूर तिला मारहाण करायचा. त्यांचे नाते वाद वाढत गेले. प्रकरण एवढे वाढले की दोघांनी कोर्ट गाठले. अखेर २०१६मध्ये करिष्मा आणि संजयचा घटस्फोट झाला.

मात्र करिष्मा पुन्हा एकदा तिच्या एक्स-हसबँडसोबत दिसली आहे. करिष्मा-संजय यांनी डिनर डेटवर स्पॉट करण्यात आले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.

मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये करिष्मा कपूर आणि संजय कपूर यांना पापाराझींनी स्पॉट केले. संजय कपूरला यवेळी ब्लॅक अँड व्हाईट सुटाबुटात होता तर करिष्मा कापूरने फुलांचे नक्षीकाम असलेला ब्लॅक ड्रेस घातला होता. करिष्मा या ड्रेसमध्ये खूप गोड दिसत होती.

करिष्मा कपूर आणि संजय कपूर रेस्टॉरंटमधून बाहेर येत असताना पापाराझींनी त्यांना स्पॉट केली. दोघांनीही पापाराझींना त्यांचे फोटो काढू दिले. त्यानंतर दोघे निघून गेले. निराशा करिश्माला तिच्या एक्स-हसबँडसोबत पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी करिष्माला सपोर्ट केला आणि तर काहींनी ट्रोल केले आहे.

करिष्माच्या पाठिंबा देत एका चाहत्याने कमेंट केली, 'करिष्मा तू खूप चांगली आहेस. तू सर्व चांगलं डिसर्व करतेस. तर एकाने लिहिले की, 'करिष्माची संजयसोबतची भेट फक्त मुलांसाठी आहे. ती तिच्या कुटुंबाला चोखपणे सांभाळते.' त्याचवेळी काही यूजर्सनी करिश्मावरच प्रश्न उपस्थित केला की घटस्फोट झाला. अभिनेत्रीने त्याच्यावर आरोप केले आणि आता ते पुन्हा भेटत आहेत. काही यूजर्सनी तर करिश्माला तिच्या पतीवर लावलेल्या आरोपांची आठवण करून दिली आहे.

करिष्मा कपूर आणि संजय कपूरचे लग्न 13 वर्षांनंतर मोडले. त्यांना एक मुलगी समायरा आणि एक मुलगा कियान आहे. करिष्मापासून वेगळे झाल्यानंतर संजय कपूरने प्रिया सचदेवासोबत लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI चा मोठा निर्णय! आता या खातेधारकांसाठी डिजिटल सेवा सुरु; कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा

Maharashtra Dasara Melava Live Update : महात्मा गांधी यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय - भागवत

Governemnt Job: बेरोजगारांना मोठा दिलासा! १० हजार ३०९ जणांना शासकीय नोकरी | VIDEO

Maharashtra Rain : राज्यात मान्सूनला निरोप कधी? परतीच्या पावसाची तारीख आली समोर

Maggi Recipe : पहाडी-स्टाइल चटकदार मॅगी घरीच १० मिनिटांत बनेल, फक्त फॉलो करा 'ही' रेसिपी

SCROLL FOR NEXT