Kareena Kapoor Net Worth Saam TV
मनोरंजन बातम्या

HBD Kareena Kapoor: 'पतौडी' घराण्याची सून करीना आहे कोट्यवधीची मालकीण, चित्रपट हातात नसतानाही वर्षाला कमावते इतके कोटी

Kareena Kapoor Net Worth: लहानपणापासून करीना कपूर आलिशान जीवन जगत आली आहे.

Pooja Dange

Kareena Kapoor Birthday Special:

अभिनेत्री करीना कपूरचा आज ४३ वा वाढदिवस आहे. करीनाने डान्स आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. करीना लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. तिचा 'जाने जा' हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

फिल्मी बॅकग्राऊंड असलेल्या करीना कपूरने २००० साली आलेल्या 'रेफ्युजी' या चित्रपटातून पदार्पण केले. तिचा हा पहिला चित्रपट सुपर डुपर फ्लॉप ठरला होता. परंतु याचा परिणाम करीना कपूरच्या सिनेकारकिर्दीवर झाला नाही. आज ती बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिची फॅन फॉलोविंग देखील भरपूर आहे.

कपूर कुटुंब गेली कित्येक वर्षे सिनेसृष्टीत सक्रिय आहे. या कुटुंबाने अनके सुपरस्टार बॉलिवूड दिले आहेत. तसेच या कुटुंबकडे मोठमोठे चित्रपट स्टुडिओ देखील आहेत. लहानपणापासून करीना कपूर आलिशान जीवन जगत आली आहे. असे असले तरी चित्रपटामध्ये स्वतःची ओळख मिळविण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला.

बॉलिवूडमध्ये यश मिळविल्यानंतर करीना कपूरने पतौडी राजपूत सैफ अली खानशी लग्न केले. सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर करीना मुंबईतील एका आलिशान घरात राहत आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे. तसेच त्यांच्याकडे पतौडी हाउस सुद्धा आहे. या घराची किंमत ८०० कोटी रुपये आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार करीनाची एकूण संपत्ती ४८५ कोटी रुपये आहे. करीना कपूर एका चित्रपटासाठी अंदाजे ८-१० कोटी रुपये आकारते. जाहिराती, कोलॅब्रेशन या सगळ्यातून देखील अभिनेत्रीला भरपूर पैसे मिळतात. करीना कपूरकडे अनेक आलिशान गाड्या आहे. तसेच तिच्याकडे किंमती दागिने देखील आहेत. करीनाचे स्वतः च्या मालकीचे स्विझर्लंडमध्ये खूप मोठे घर देखील आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT