Karan Mehra and Nisha Rawal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Karan Mehra-Nisha Rawal Case: करण मेहराला हवाय आता मुलाचा ताबा, म्हणाला...

टीव्ही अभिनेता करण मेहरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी करणची पत्नी निशा रावलने त्याच्यावर घरगुती हिंसाचारासह अनेक आरोप केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Karan Mehra-Nisha Rawal Case Update | मुंबई : टीव्ही अभिनेता करण मेहरा (Karan Mehara) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी करणची पत्नी निशा रावलने त्याच्यावर घरगुती हिंसाचारासह अनेक आरोप केले होते. आता १४ महिन्यांनी करणने पत्रकार परिषद घेऊन पत्नी निशा रावल(Nisha Rawal)वर गंभीर आरोप केले आहेत. मानलेल्या भावासोबत तिचे अफेअर असल्याचे आणि लहान मुलासमोर दारू आणि सिगारेट ओढण्यासारखे प्रकार केल्याचे आरोप केले आहेत. आता करणला त्याचा मुलगा कविशचा ताबा हवा आहे.

करण मेहरा याने सांगितले की, त्याला त्याच्या ४ वर्षांच्या मुलाची खूप आठवण येते आणि तो त्याच्या कस्टडीसाठी कायदेशीर लढाई लढणार आहे. करण पत्रकार परिषदेत म्हणाला, 'निशा तिच्या मानलेल्या भावासोबत राहते. माझा ४ वर्षांचा मुलगाही त्याच घरात राहतो. त्यामुळे मी माझ्या मुलाला म्हणजेच कविशला भेटू शकत नाही, शेवटचा मी कविशला २ नोव्हेंबरला भेटलो होतो'.

'आपल्या देशात महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आहेत, कारण यापूर्वी महिलांना खूप त्रास सहन करावा लागत होता. मात्र या कायद्यांचा कोणीही गैरफायदा घेऊ नये. जॉनी डेप आणि अंबर हर्ड प्रकरणातील निकाल प्रत्येकाने पाहिला आहे, मी त्याच्या तपशीलात जाणार नाही. मी फक्त माझ्या मुलाचा ताबा मिळेपर्यंतच लढणार आहे', असे करण पत्रकार परिषदेत म्हणाला.

गेल्या वर्षी टीव्ही इंडस्ट्रीतील या प्रसिद्ध कपलमध्ये कौटुंबिक वाद झाले होते. त्यावेळी निशाने गोरेगाव पोलीस ठाण्यात करणविरोधात तक्रार दाखल केली. निशा थेट पोलीस ठाण्यात पोहोचली आणि करणने तिची अशी अवस्था केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणावरून करण मेहराला अटकही केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT