Tejasswi-Karan: असं दिसतंय की अखेर प्रतीक्षा संपली आहे! करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सेलिब्रिटी मास्टरशेफच्या अलिकडच्या भागात, फराह खानने तेजस्वीच्या आईला विचारले, “शादी कब होगी?” यावर, अभिनेत्रीच्या आईने पुष्टी केली की तिची मुलगी याच वर्षी लग्न करणार आहे.
फराह खानने पुष्टी दिल्यानंतर तेजस्वी प्रकाशचे अभिनंदन केले, तर अभिनेत्री लाजून म्हणाली, “असं काही नाही”. मनोरंजक गोष्ट म्हणजे, तेजस्वी प्रकाशने करण कुंद्रासोबत कोर्ट मॅरेज करण्याचे संकेत दिल्यानंतर काही दिवसांनी हे घडले. तेजस्वी म्हणाली होती “मला सामान्य कोर्ट मॅरेज करायला हरकत नाही. आम्ही त्यानंतर फिरायला जाऊ एकमेकांसोबत आणखी वेळ घालवू,” असे ती म्हणाली.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशची प्रेमकहाणी कोणापासूनही लपलेली नाही. दोघे बिग बॉस १५ च्या घरात भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. अलिकडेच, करणने सेलिब्रिटी मास्टरशेफमध्येही तेजस्वीच्या कामाचे कौतुक केले आणि सांगितले की शोचे स्वरूप खूप "कठीण" असले तरी, तेजस्वी तिचे उत्तम प्रयत्न करण्यात कोणतीही कसर सोडत नाही.
करण आणि तेजस्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात आणि त्यांचे क्यूट फोटो सतत पोस्ट करत असतात. चाहत्यांना हे कपल बिग बॉसपासून फार आवडते. चाहत्यांची देखील या कपलने लवकर लग्न करावे अशी इच्छा होती अखेर तेजस्वीच्या आईने पृष्टी केल्यानंतर चाहते आनंदी असून दोघांना शुभेच्या देत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.