Tejasswi Prakash On Marriage Plans Instagram @tejasswiprakash
मनोरंजन बातम्या

Karan Kundrra - Tejasswi Prakash: करण कुंद्रा - तेजस्वी प्रकाशने गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल फोटोमुळे जोडप्याचे गुपित उघड

Karan Kundra News Gym: करण कुंद्राने दिल्लीत जिम देखील सुरु केली आहे.

Pooja Dange

Karan Kundrra - Tejasswi Prakash Marriage:

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ही सुंदर नेहमीच चर्चेत असते. या दोघांच्या प्रेमकथेची सुरुवात बिग बॉस 15 मध्ये झाली. या दोघांच्या मैत्रीला प्रेमात बदलतांचा प्रवास अनेकांनी पहिला आहे. करण आणि तेजस्वी यांना एकत्र पाहणं प्रेक्षकांना देखील खूप आवडतं. अनेकदा या दोघांना त्यांच्या लग्नाविषयी विचारण्यात आले आहे. पुन्हा एकदा त्याच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला आहे.

अलीकडच्या करण आणि तेजस्वी प्रकाश यांचे लग्न झाले आहे, अशी चर्चा सुरू आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी अलीकडेच मुंबईतील इस्रायलचे दूत कोबी शोशानी यांची भेट घेतली. कॉन्सुल जनरलने तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला.

मात्र, त्याच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इस्रायली दूतांनी तेजस्वीला करणची spouse (पत्नी)’ असे म्हटले आहे. त्यांनी दोघांसोबतचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “करण कुंद्रा हा प्रिय अभिनेता आहे आणि एक सज्जन माणूस देखील आहे. त्याची जोडीदार तेजस्वी प्रकाशला भेटून खूप आनंद झाला.”

करणने पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले आहे, “आम्हाला तुमच्या घरी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला आमच्या घरी आल्यासारखे वाटले.”

तेजस्वी आणि करण कुंद्रा यांचे फोटो आणि कॅप्शन पाहून चाहते वेडे झाले आणि फोटोवर कमेंट करू लागले. तेजस्वी आणि करण विवाहित आहेत हे जाणून त्यांना आनंद झाला. तसेच लवकरच त्यांचे लग्न व्हावे अशी आशा चाहत्यांना व्यक्त केली.

एका युजरने लिहिले आहे, “तुम्ही जोडीदार नसल्याचा दावा करणाऱ्या सर्वांसाठी.. तुम्ही लोक इतके महत्त्वाचे नाहीत की त्यांची वैवाहिक स्थिती जाणून घेणेही महत्त्वाचे नाही.. कदाचित ते विवाहित असतील?... मुख्य म्हणजे होस्ट करणच्या ओळखीचा आहे म्हणून ती त्याची जोडीदार म्हणून तिथे गेली होती.. तिच्या CV च्या आधारावर नाही.. सो चिल!"

करण कुंद्राच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर तेरे इश्क में घायालमध्ये रीम शेख आणि गश्मीर महाजनी सोबत दिसला होता. तेजस्वी प्रकाशने नुकताच तिचा शो 'नागिन 6' पूर्ण केला.

दरम्यान करण कुंद्राने दिल्लीत जिम देखील सुरु केली आहे. याविषयी बोलताना करण म्हणाला, 'रोडीज फ्रँचायझीचा भारतातील तरुणांना आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रवृत्त करणार आहे.

कुंद्रा यांनी रोडीज जिम फिटनेस प्रेमींना देणार्‍या अनोख्या अनुभवाबद्दल उत्सुकता व्यक्त केली, तसेच फ्रँचायझीला वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात यश मिळवून देणारा असाच उत्साह वाढवण्याचे वचन दिले.'

तसेच यावेळी करणला त्याच्या आणि तेजस्वी प्रकाशच्या लग्नाविषयी विचारण्यात आले. तेव्हा तो मला सिरांनी म्हटले आपण आधी जिम सुरू करू. लग्नाचं त्यानंतर बघू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT