Karan Johar In Interview spoke about his personal life  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Karan Johar With Twinkle Khanna: 50 वर्ष उलटल्यानंतर करण जोहरने उलगडले रिलेशनशिपमध्ये न येण्याचे कारण

करण जोहरने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Karan Johar Interview: बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता कारण जोहर याने अनेकांचे करिअर बनवली आहे. करण अनेक सेलेब्रिटींचा लाडका आणि जवळचा आहे. करण जोहरने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली आहेत. एवढेच नाही तर तो अंगापेक्षा मोठे कपडे का घालतो याचाही खुलासा यावेळी करणने केला आला.

करण अद्याप कोणत्याही रिलेशनशिपमध्ये का आला नाही, हेही त्याने सांगितले. बॉडी शेमिंगबद्दल बोलताना करणने सांगितले की, खूप पूर्वी त्याला वजन जास्त असल्याने चिडवले होते. तो अजूनही यातून बाहेर आलेला नाही. करण म्हणाला, 'मी अजूनही माझे शरीर स्वीकारू शकलो नाही त्यामुळे मला फिट कपडे घातल्यावर त्रास होतो आणि मला अस्वस्थ वाटते. ट्विंकल खन्नाने घेतलेल्या मुलाखतीत त्याने या सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत.

ट्विंकल खन्नाशी बोलताना करण जोहर म्हणाला की, 'कधी कधी मी अस्वस्थ होतो. मला घट्ट कपडे घालायला त्रास होतो. मी टी-शर्ट किंवा शर्ट घालू शकत नाही. असे कडपे पाहून मला विचित्र वाटते. मला माझ्या कंबरेच्या आकाराबद्दल खात्री नाही, म्हणून मी या सर्व गोष्टी घालणे टाळते. जेव्हा मी या प्रकारची फॅशन करण्यास सुरूवात केली तेव्हा मला ते आवडू लागले आणि तीच माझी ओळख बनली. वजन या शब्दाचा मला त्रास झाला होता, पण ती माझी ओळख नव्हती. (Bollywood)

या मुलाखतीमध्ये करण जोहरनेही रिलेशनशिपबद्दल सांगितले आहे. करण म्हणाले की, 'अनेकदा मी या प्रकरणात गोंधळ घालतो. मी अशा लोकांचा जवळ जातो ज्यांना माझ्या भावना समजत नाहीत. बरेच प्रयत्न करूनही मी कोणत्याही रिलेशनशिपमध्ये येऊ शकलो नाही. जेव्हा नेहमी कोणाच्या जवळ गेलो की मीच मागे फिरायचो. मी या समस्येतून बाहेर पडू शकलो नाही. आता मला असेही वाटते की माझ्या ज्या भावना आहेत त्या फक्त माझ्या आई आणि मुलांसाठी आहेत. त्यांच्याशिवाय मला माझ्या आयुष्यात इतर कोणाचाही समावेश करायचा नाही. (Karan Johar)

करण जोहरने अलीकडेच त्याच्या रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. त्याने सांगितले की, आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तसेच त्याचे काही चित्रपट फ्लॉपही ठरले. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Cleaning Tips: लादी पुसताना पाण्यात टाका मीठ, नकारात्मक ऊर्जा होईल दूर

Bribe Case : गॅस एजन्सीवर कारवाई टाळण्यासाठी पावणेदोन लाखांची लाच; मुख्य निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Early signs of gastric cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी होतात 'हे' बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची मदत घ्या

सेक्सटॉर्शन, डिजिटल अरेस्ट.. मुंबईकरांनी १५ महिन्यात गमावले ११२७ कोटी रूपये

Tax Saving Tips : करदात्यांच्या कामाची बातमी! टॅक्स वाचवण्याचे ५ मार्ग, ITR फाइल करण्याआधी नोट करा

SCROLL FOR NEXT