Karan Johar on Babil Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Karan Johar: बाबिल खानच्या व्हिडिओवर करण जोहर झाला इमोशनल; म्हणाला, 'एक वडील म्हणून मला...'

Karan Johar on Babil Khan: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने अलीकडेच अभिनेता बाबिल खानच्या व्हायरल झालेल्या भावनिक व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.

Shruti Vilas Kadam

Karan Johar on Babil Khan: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने अलीकडेच अभिनेता बाबिल खानच्या व्हायरल झालेल्या भावनिक व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. बाबिलने या व्हिडिओमध्ये त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीला "खोटं" असे म्हटलं होते, यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. करण जोहरने या प्रसंगावर बोलताना सांगितले की, "एक पालक म्हणून मला तो पाहून फार वाईट वाटले." त्यांने बाबिलच्या भावनिक अवस्थेबद्दल सहानुभूती व्यक्त केली.

बाबिल खान, दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा आहे. याने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता यामध्ये तो रडताना दिसत होता आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला "सर्वात खोटं" असे म्हटले होते. या व्हिडिओमध्ये त्याने अनन्या पांडे, शनाया कपूर, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अरिजीत सिंग यांसारख्या कलाकारांची नावे घेतली होती. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच त्याने ती पोस्ट डिलीट केली आणि सोशल मीडिया अकाउंटही बंद केला.

या घटनेनंतर बाबिलच्या टीमने एक स्पष्टीकरण दिले की, त्याचे शब्द चुकीच्या पद्धतीने समजले गेले आहेत. त्याने ज्यांची नावे घेतली होती, त्यांच्याबद्दल त्याला खूप आदर आहे आणि त्याच्या भावना चुकीच्या प्रकारे मांडल्या गेल्या आहेत. या प्रसंगानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी बाबिलला पाठिंबा दर्शविला. अनन्या पांडे, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि इतरांनी सोशल मीडियावर त्याच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

करण जोहरने या प्रसंगाचा उल्लेख करताना सांगितले की, "मी बाबिलचा व्हिडिओ पाहिला आणि एक पालक म्हणून मला फार वाईट वाटले." त्याने बाबिलच्या भावनिक अवस्थेबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि त्याच्या मन:स्थितीची काळजी घेण्यास सांगितले. या प्रसंगामुळे बॉलिवूडमध्ये मानसिक आरोग्य आणि कलाकारांच्या भावनिक स्थितीबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT