Karan Johar reacted to Priyanka Chopra Anushka Sharma's allegation
Karan Johar reacted to Priyanka Chopra Anushka Sharma's allegation  Saam TV
मनोरंजन बातम्या

Karan - Kangana Cold War: करणची हिंदी पाहून कंगना पेटली; म्हणाली 'ही तर सुरुवात आहे...'

Pooja Dange

Karan Johar-Kangana Ranaut Cold War: बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर नेपोकिड्स आणि इतर यांच्या भेदभाव करतो असा आरोप अनेकांनी त्याच्यावर केला आहे. तर हॉलिवू अभिनेत्री प्रियांका चोप्रा नई बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील त्याच्यावर केले आहेत. यामुळे गेले काही दिवस कारण सतत चर्चेत आहे. तसेच आता अभिनेत्री कंगना रनौत देखील करणसह बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

करण आणि कंगना यांच्या शीतयुद्ध गेली अनेक वर्ष सुरु आहे. काल कंगनाचे करणचे नाव न घेता सोशल मीडिया पोस्टद्वारे निशाणा साधला. करणने शेअर केलेल्या पोस्टवर बॉलिवूड क्वीनने प्रत्युत्तर दिले आहे.

कंगनाने करणला चोख प्रत्युत्तर देत इन्स्टाग्रामवर एक स्टोरी नोट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिने लिहिले की, 'एक काळ असा होता की चाचा चौधरी आणि नेपो माफियाने नॅशनल टीव्हीवर माझा अपमान केला, कारण मला इंग्रजी येत नव्हते... आज मला त्यांची हिंदी पाहून विचार आला, आता फक्त तुमची हिंदी सुधारली आहे.. पुढे बघा काय काय होईल ते'

कंगनाच्या पोस्टआधी करणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलच्या स्टोरीवर एक नोट शेअर केली होती. या स्टोरीमध्ये त्याने लिहिले की, ''लगा लो इल्जाम...हम झुकने वालों में से नहीं हैं, झूठ के बन जाओ गुलाम...हम बोलने वालों में से नहीं....जितना नीचा दिखाओगे..जितने आरोप लगाओगे...हम गिरने वालों में से नहीं..हमारा करम हमारी विजय है..आप उठा लो तलवार..हम मरने वालों में से नहीं..।''

Karan Johar Kangana Ranaut Instagram Story

कंगना आणि करणमधील भांडण दिवसेंदिवस वाढत आहे. दोघेही नेहमी एकमेकांना टोमणे मारण्याची संधी शोधत असतात. करण जोहर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाद्वारे दीर्घ काळानंतर दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत.

कंगनाचा इंदिरा गांधींवर आधारित चित्रपट 'इमेर्जन्सी' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन खुद्द कंगना रनौतने केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

SCROLL FOR NEXT