Kapil Sharma Birthday Instagram @kapilsharma
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma Birthday: कपिलचं एका एपिसोडचं मानधन जाणून तुम्हाला चक्करच येईल..

Kapil Sharma Net Worth: कॉमेडियन कपिल भारतातील एक दिग्गज आणि श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.

Pooja Dange

Kapil Sharma Fees For Show: 'द कपिल शर्मा शो' या विनोदी मालिकाचे सर्वेसर्वा कपिल शर्मा याचा आज वाढदिवस आहे. कपिल त्याच्या ४२वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनी टीव्हीवरील एक रिऍलिटी शोचा विजेता झाल्यानंतर कपिलचे आयुष्य बदलले.

कपिल शर्मा बॉलिवूडमध्ये मोठा सिंगर होण्याचे स्वप्न घेऊन आला होता. नशिबाने तो कॉमेडीयन बनला आणि जगप्रसिद्ध झाला. कॉमेडियन कपिल भारतातील एक दिग्गज आणि श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. आज त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याची एकूण संपत्ती आणि बरंच काही.

कपिल टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' होस्ट आहे. त्याच्या शोमध्ये विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज सहभागी होतात आणि शोच्या सेटवर त्यांच्यासोबत खूप गंमतीजंमती करतात.

कपिलने पहिल्यांदा प्रसिद्ध टीव्ही कॉमेडी शो 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' आणि 'फॅमिली टाइम विथ कपिल' होस्ट केले. त्यानंतर तो 'कॉमेडी नाईट विथ कपिल'मध्ये दिसला. कपिलचे हे सर्व शो जबरदस्त हिट ठरले.

कपिल एक यशस्वी कॉमेडियन आहे त्यासह तो एक अभिनेता म्हणूनही नावारूपाला येत आज. अब्बास मस्तान दिग्दर्शित 'किस किसको प्यार करूं' या चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटांच्या दुनियेत पदार्पण केले. यानंतर तो 'फिरंगी' चित्रपटातही दिसला. मात्र चित्रपटात तो काही खास कामगिरी करू शकलेला नाही. कपिलचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. कपिल अलिकडेच नंदिता दास दिग्दर्शित 'ज्विगॉटो' चित्रपटातही दिसला होता.

कपिलच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, अभिनेता आज $40 दशलक्ष संपत्तीचा मालक आहे. म्हणजे कपिल 300 कोटी रुपयांचा मालक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल एका शोसाठी 50 लाख ते 70 लाख रुपये घेतो. कपिलची भारतातील सर्वात महागड्या कॉमेडियनमध्ये गणना केली जाते. अभिनेत्याची एकूण संपत्ती दरवर्षी सुमारे 15 टक्क्यांनी वाढत आहे.

कपिल खूप लक्झरी लाईफस्टाईल जगतो. त्याला गाड्यांचा शौक आहे. कपिलकडे लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ एस क्लास आहे, जिची किंमत 1.19 कोटी आहे. याशिवाय 50 लाख रुपये किंमतीची मर्सिडीज बेंझ सी क्लास आहे, तसेच एसयूव्ही रेंज रोव्हर इव्होक, जिची किंमत 95.53 लाख रुपये आहे आणि व्होल्वो XC90, ज्याची किंमत 80 लाख रुपये आहे.

कारशिवाय कपिलकडे आलिशान आणि महागड्या बाइक्स आहेत, 15 लाख किंमतीची सुझुकी हायाबुसा, 30 लाख किमतीची Kawasaki Ninja H2R आणि 2 लाख किमतीची बुलेट 350 यांचा समावेश आहे. कपिल शर्मा मुंबईतील गोरेगाव येथे एका आलिशान फ्लॅटमध्ये राहतो.

या आलिशान फ्लॅटची किंमत 15 कोटी रुपये आहे. कपिल येथे त्याची आई, पत्नी आणि मुलीसोबत राहतो. कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी सोशल मीडियावर त्यांच्या लक्झरी फ्लॅटचे फोटो शेअर करत असतात. याशिवाय कपिलकडे एक आलिशान व्हॅनिटी व्हॅन आहे, ज्याची किंमत सुमारे 5.5 कोटी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT