Sugandha Mishra Baby Shower Instagram
मनोरंजन बातम्या

Sugandha Mishra Baby Shower: ‘कपिल शर्मा’ फेम सुगंधा लवकरच होणार आई, महाराष्ट्रीयन पद्धतीने थाटामाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

Sugandha Mishra Shared On Baby Shower Photos: सुंगधा आणि संकेतच्या डोहाळे जेवणाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Chetan Bodke

Sugandha Mishra Baby Shower Photos

लोकप्रिय टेलिव्हिजन कपल सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले कायमच आपल्या अभिनयामुळे ही जोडी चर्चेत राहते. गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत बेबी बंप फोटोशूट करत ‘गुड न्यूज’ शेअर केली होती. नुकताच अभिनेत्रीचा मराठमोळ्या पद्धतीत अगदी थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. सध्या सोशल मीडियावर सुगंधा आणि संकेतच्या डोहाळे जेवणाचे फोटो बरेच व्हायरल होत आहेत.

सुगंधाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडला आहे. यावेळी कार्यक्रमामध्ये दोघांच्या कुटुंबीयांसोबतच त्यांचे मित्र- मैत्रीणही उपस्थित होते. यावेळी सुगंधाने लाल रंगाची पैठणी परिधान केली होती. तर संकेतने लाल रंगाचा कोट आणि क्रिम रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. दोघांच्याही लूकचे चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे. यावेळी ओटी भरण्यासोबतच विधिवत पुजा असे सर्वच विधी महाराष्ट्रीयन परंपरेनुसार झाले एवढंच नाही तर कार्यक्रमामध्ये त्या दोघांनी डान्स सुद्धा केला. (Serial)

डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करताना सुंगधा आणि संकेतने कॅप्शन दिले की, “आमच्या लहान बाळाच्या येण्याचे आम्ही दोघेही सेलिब्रेशन करीत आहोत. आम्ही डोहाळे जेवण पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने (डोहाळे जेवण) सर्व विधी केल्या आहेत. ओटी भरणे, पूजा, बर्फी-पेड्याचा खेळ, धनुष्यबाण, केक कापणे, डायपर बदलणे असे मजेदार खेळ सुद्धा आम्ही खेळलो. एका स्पेशल गाण्यावर आम्ही दोघांनीही परफॉर्मन्स केला. ज्या गाण्यावर डान्स केला ते गाणं सुंगधाने लिहिले आणि गायले आहे.” (Social Media)

सुगंधाच्या बेबी शोवरच्या फोटोंवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. जितेंद्र जोशी, मेघना एरंडे, मुक्ती मोहन, गौहर खान, आदिती सारंगधर, बेबिका धुर्वेसह अनेक सेलिब्रिटींनी सुगंध व संकेतला शुभेच्छा दिल्या आहेत. सुगंधा आणि संकेत यांनी लग्नाआधी अनेक वर्ष एकमेकांना एकत्र डेट केलं होतं. त्यानंतर २६ एप्रिल २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर ते आई-बाबा होणार आहेत. सुगंधाचा पती पेशाने डॉक्टर आणि कॉमेडियन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT