कंगना पोहचली सेल्युलर जेलमध्ये, सावरकरांच्या फोटोला केलं अभिवादन Saam Tv
मनोरंजन बातम्या

कंगना पोहचली सेल्युलर जेलमध्ये, सावरकरांच्या फोटोला केलं अभिवादन

बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमी विविध कारणांमुळे किंवा तिच्या विविध वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत राहत असते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमी विविध कारणांमुळे किंवा तिच्या विविध वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत राहत असते. आता तिने इन्स्ट्रग्रामवर केलेली एक पोस्ट सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ज्यामध्ये तिने अंदमानातील सेल्युलर जेलला भेट दिल्याचे फोटो आणि त्यासोबत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काही मजकूर टाकलेला आहे.

आपल्या पोस्टमध्ये कंगना रणौत ही सांगत आहे की, “मी आज अंदमान बेटावर आल्यावर, पोर्ट ब्लेअर या ठिकाणी असलेल्या सेल्युलर जेलमधील काला पाणी सेलला भेट दिली आहे. त्या ठिकाणी वीर सावरकरांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते. मी मनापासून हादरून गेले होते. जेव्हा अमानुषता शिगेला पोहोचली होती, तेव्हा सावरकरांच्या रूपाने मानवता शिखरावर पोहोचली आणि अमानुषतेचे भय न बाळगता नजरेला नजर भिडवत ते धैर्याने क्रूर शिक्षेला सामोर गेले होते.

हे देखील पहा-

प्रत्येक क्रूर कृत्याचा त्यांनी निर्धाराने विरोध केला होता. तसेच, ब्रिटिशांना सावरकरांची किती भीती वाटत असावी याची कल्पना आपल्याला येते, ती त्यांना देण्यात आलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेवरून. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या या लहानशा बेटातून पळून जाणे अशक्य होते, तरी देखील त्यांनी त्यांना पायात साखळदंड घालून अतिजाड तटबंदीचा तुरुंग बांधला होता आणि त्यामध्ये एका लहानशा खोलीत बंदिस्त ठेवण्यात आलं होत. जणू काही त्या अथांग सागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यावर स्वार होऊन ते उडून जाणार होते.

यावरून ब्रिटिशांचा भ्याडपणा दिसून येत आहे. काला पाणी तुरूंगात ती खोली हेच स्वातंत्र्याचे खरे सत्य आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात मात्र, हे वास्तव कधी शिकवले जात नाही. मी कोठडीत ध्यान करून वीर सावरकरांबद्दल कृतज्ञतेने मनापासून आदर व्यक्त करत आहे…” असे कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. या बरोबरच, स्वतंत्रता संग्रामामधील या खऱ्या नायकास माझे कोटी कोटी प्रणाम…जय हिंद…” असे देखील कंगना आपल्या पोस्टमध्ये शेवटीला म्हली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता जमिनीची वाटणी होणार मोफत, फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Earthquake : मणिपूरला भूकंपाचे हादरे! ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Periods Mental Health : पीरियड्समध्ये न चुकता करा 'ही' कामे, चिडचिड अन् मूड स्विंग्स होणारच नाही

Who Is Rajnandini Pawar: महाराष्ट्राची कन्या देशात ठरली सर्वात सुंदर! कोण आहे राजनंदिनी पवार? 'मिस इंडिया 2026' ची उपविजेती

SCROLL FOR NEXT