kangana ranaut on Twitter Saam tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: 'माझे खाते पुन्हा सूरू केले तर..'; इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर कंगना स्पष्टच बोलली

मी ट्विटरवर परत आले तर लोकांच्या जीवनात खळबळ उडेल आणि माझे जीवन त्रासदायक होईल, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना रनौतने दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kangana Ranaut On Twitter: अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट मे २०२१ मध्ये ‘ट्विटर नियमांचे वारंवार उल्लंघन’ केल्यामुळे कायमचे निलंबित करण्यात आले आहे. तिच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकांनी तिच्या विरोधात ट्विटरकडे तक्रार केली होती. अभिनेत्रीने ट्विटरवर आणखी 'चटपटीत बातम्या' देण्याचे वचन दिले आहे. परंतु त्यासाठी तिने एक अट घातली आहे.

इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर कंगनावरील बंदी उठेल आणि ती ट्विटरवर पुन्हा येईल अशी आशा तिच्या चाहत्यांना होती.

हिमाचल प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान कंगनाने ट्विटरने तिच्यावर घातलेल्या बंदीविषयी प्रतिक्रिया दिली आहे. तिने सांगितले की, ट्विटरवरील तिचे खाते एका वर्षाच्या आत निलंबित करण्यात आले. तिला तिच्या पोस्टसाठी इंस्टाग्रामकडून तीन ताकीद देखील मिळाली आहे. (Program)

"मी एक वर्ष ट्विटरवर होतो आणि ट्विटर मला एक वर्षही सहन करू शकले नाही… मी मे महिन्यात इंस्टाग्रामवर एक वर्ष पूर्ण केले आहे आणि मला तीन वेळा त्यांनी ताकीद दिली आहे. म्हणून मी इंस्टाग्राम वापरणार नाही असे ठरवले आणि त्याची जबाबदारी माझ्या टीमने घेतली. आता सर्व काही ठीक आहे. कुणालाही त्यात काही अडचण नाही." (Social Media)

"मी ट्विटरवर परत आले तर लोकांच्या जीवनात खळबळ उडेल आणि माझे जीवन त्रासदायक होईल. माझ्यावर वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक खटले दाखल झाले आहेत. मी ट्विटरवर नाही याचा मला आनंद आहे. पण जर माझे खाते पुन्हा सुरू केले तर नक्कीच… तुम्हाला भरपूर 'मसाला' मिळेल," असे कंगना म्हणाली आहे. (Kangana Ranaut)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी खा. प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजप आमदारांची मागणी

सरकारी रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

Mini Kashmir Tourism: महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! विकेंडला निसर्गाच्या कुशीत पार्टनरसोबत घालवा वेळ, रोमॅंटिक ठिकाणी कसं जाल?

विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; तीन नेत्यांचे तडकाफडकी राजीनामे

Crime News : अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाची आईनंच केली हत्या; एक क्लू अन् हादरवून टाकणारा प्लान उघड

SCROLL FOR NEXT