Kangana Ranaut's nephew's name Instagram @kanganaranaut
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Post: कंगना रनौत झाली आत्या; बाळाच्या फोटोसोबत नावही केलं शेअर; पण नेटकऱ्यांनी दिले उपदेशाचे डोस

Kangana Ranaut News: कंगना रनौतने सोशल मीडियावर पोस्ट करत आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Pooja Dange

Kangana Ranaut's nephew's name:

अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिचा आगामी चित्रपट 'तेजस'मुळे चर्चेत आहे. दरम्यान कंगनाने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. कंगना आत्या झाली आहे.

कंगना रनौतने सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी शेअर केली आहे. कंगनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची आई आशा, बहीण रंगोली भाऊ अक्षत आणि वाहिनी रिंकू देखील आहे. सर्वजण बाळाच्या येण्याने खूप आनंदी आहेत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कंगना रनौतने पोस्ट करत लिहिले आहे, 'आज या सौभाग्यपूर्ण दिनी आमच्या कुटुंबात बाळाचा जन्म झालं आहे, माझा भाऊ अक्षत रनौत आणि त्याची पत्नी रितू रनौत यांना पुत्रप्राप्ती झाली आहे. यातेजस्वी आणि मन मोहून टाकणाऱ्या बालकाचे नाव आम्ही अक्ष्वथामा रनौत ठेवले आहे. तुम्ही आमच्या कुटुंबातील या नवीन सदस्याला आशीवार्द द्या, रनौत परिवार तुमचे आभारी आहोत.'

कंगनाच्या भावाच्या मुलचे नाव 'अक्ष्वथामा' ठेवण्यात आले आहे. यावरून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. नेटकरी महाभारताचा संदर्भ देत बाळाचे नाव बदलावे असे कंगनाला सांगत आहे.

नेटकऱ्यांच्या मते, 'अक्ष्वथामाला श्रीकृष्णाने शाप दिला होता. हिंदू धर्मात शापित व्यक्तीचे नाव ठेवले जात नाही.' 'अक्ष्वथामा एक महान योद्धा होता पण कृष्णाने त्यांना शाप दिल होता त्यामुळे बाळाचे नाव बदला' अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. (Latest Entertainment News)

अक्ष्वथामा हे गुरु द्रोण यांचा पुत्र होते. ते एक महान योद्धा होते. त्यामुळे अक्ष्वथामाचा मृत्यू झाला आहे यावर द्रोण यांचा विश्वास नव्हता. श्रीकुष्णाने दिलेल्या शापानंतर अक्ष्वथामा अजूनही जिवंत आहेत आणि फिरत आहेत, असे नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटले आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी कंगनाला रामायण, महाभारतातील काही नाव देखील सुचवली आहेत.

अभिनेत्री कंगना रनौतच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, तिचा 'तेजस' हा चित्रपट २७ ऑक्टोबरला २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. 'तेजस' चित्रपटातील 'जान दा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यानंतर तिचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः कंगनाने केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT