Kangana Ranaut praises Yami Gautam Instagram @yamigautam @kanganaranaut
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut-Yami Gautam: अरे बापरे! चक्क कंगना रनौतने केले यामी गौतमचे कौतुक,

Kangana Ranaut praises Yami Gautam: कंगनाने यामीच्या 'चोर निकल के भागा' या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Pooja Dange

Kangana Appreciate Yami For Movie Chor Nikal Ke Bhaga: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच बॉलिवूडवर टीका करत असते. बऱ्याचदा तिला आपण कलाकारांविषयी अपशब्द बोलताना ऐकलं आहे. कंगना फार कमी लोकांचे कौतुक करते. कंगनाला त्यांच्या कामाने प्रभावित करू शकलेले मोजकेच लोक आहेत. परंतु अभिनेत्री यामी गौतमने कंगनाला इम्प्रेस केले आहे. त्यामुळे कंगना रनौत आता यामीच्या कामाची फॅन झाली आहे.

कंगनाने यामीच्या 'चोर निकल के भागा' या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि तिचे गौतमचे कौतुक केले आहे. यामी गौतमीनं कालचं एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये यामिनीने चित्रपट 'चोर निकल के भागा' हा जागतिक स्तरावर नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला गेलेला भारतीय चित्रपट ठरला आहे, हे शेअर केले होते.

पोस्ट शेअर करताना, यामी गौतमने कॅप्शन दिले, #ChorNikalKeBhaga जगभरातील रेकॉर्ड ब्रेक करत आहे आणि सीमा ओलांडत आहे! कंगना रनौतने यामीची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकली नाही.

कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर यामीची पोस्ट शेअर करत लिहिले, यामी गौतम खूप चांगले काम करत आहे, सतत आणि शांतपणे सर्वात यशस्वी चित्रपट देत आहे, खूप प्रेरणादायी आहे.

संपूर्ण टीमचे अभिनंदन. कंगनाने या पोस्टसोबत हार्ट इमोजीही शेअर केले आहेत. कंगनाची ही पोस्ट यामीलाही आवडली, तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये कंगनाला थँक्स लिहीत रिप्लाय केला आहे.

यामी गौतमचा चित्रपट 'चोर निकल के भागा' 24 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने ओटीटीवरील ब्लॉकबस्टर चित्रपट आरआरआरलाही मागे टाकले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय सिंग आहेत. यामीशिवाय सनी कौशल आणि शरद केळकर यांच्या पात्रांनाही चित्रपटात भरभरून प्रेम मिळाले आहे. यामीच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT