Chandramukhi 2 Trailer Out Instagram @kanganaranaut
मनोरंजन बातम्या

Chandramukhi 2 Trailer: अफलातून डान्स, जबदस्त लूक साऊथमध्ये कंगनाचीच हवा; 'चंद्रमुखी 2'चा ट्रेलर प्रदर्शित

Kangana Ranaut Looks in Chandramukhi 2: चंद्रमुखीच्या भूमिकेत कंगना सुंदर दिसत आहे.

Pooja Dange

Chandramukhi 2 Trailer Out:

कंगना रनौत आणि राघव लॉरेन्स यांच्या 'चंद्रमुखी २'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चंद्रमुखीच्या भूमिकेत कंगना सुंदर दिसत आहे. कंगनाने राजाच्या दरबारातील नर्तिकेची भूमिका साकारली आहे.

ट्रेलरमध्ये काय दाखविण्यात आले आहे?

'चंद्रमुखी २'च्या ट्रेलरमध्ये एक मोठे कुटुंब दाखविण्यात आले आहे. हे कुटुंब त्यांच्या हवेलीत राहायला येते. चंद्रमुखी असलेल्या दक्षिण ब्लॉकमध्ये जाणे टाळावे असे त्यांना सांगण्यात येते. चित्रपटाला १७ वर्षांनी नवीन वळण मिळते असे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. चंद्रमुखी वेट्टयन राजाच्या दरबारातील नर्तकी असते. हे तिचॆ २०० वर्ष जुनी कथा वर्तमानाशी जोडण्यात आली आहे.

आज चेन्नई येथे ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला आहे. या पिवळ्या रंगाची निळा कथा असलेली साडी नेसून आली होती. केसात गजरा माळला होता. तर साडीच्या काठाच्या रंगाचा ब्लाउज घातला होता.

'चंद्रमुखी २'चे दिग्दर्शन पी वासू यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये वडीवेलु, राधिका सरतकुमार, लक्ष्मी मेनन, सृष्टी डांगे, मिथुन श्याम, महिमा नाम्बियार, राव रमेश, विग्नेश, रवी मारिया, सुरेश मेनन, टी. एम. कार्तिक आणि सुबिका क्रिष्णन आहेत. (Celebrity)

रजनीकांत आणि ज्योतीक यांच्या ब्लॉकबस्टर तामिळ चित्रपट चंद्रमुखीचा सिक्वेल आहे. चंद्रमुखी चित्रपट गणेश चतुर्थी मुहूतार्वर म्हणजे १५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये चित्रपट पाहायला मिळणार आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT