Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Kangana Ranaut: कंगना रणौतने CJP प्रवक्ते सौरव दास यांच्यावर पुन्हा टीका करत त्यांना 'बेकार' म्हटले. Gen Z वादानंतर दोघांतील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र झाला.

Shruti Vilas Kadam

Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत आणि 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे प्रवक्ते सौरव दास यांच्यातील शाब्दिक वाद आणखी तीव्र झाला आहे. 'जनरेशन झेड' (Gen Z) पिढीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुरू झालेल्या या वादात आता कंगनाने सौरव दास यांच्यावर वैयक्तिक टीका करत त्यांना 'निरुपयोगी' आणि 'बेरोजगार' म्हटले आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सौरव दास यांच्या ANI ला दिलेल्या मुलाखतीची क्लिप शेअर केली. त्यावर प्रतिक्रिया देताना तिने दास यांच्या स्वतःला 'विद्यार्थी' म्हणवून घेण्यावर प्रश्न उपस्थित केला. "मी गुगलवर त्यांच्याबद्दल माहिती शोधली. ते २८ वर्षांचे आहेत. एवढ्या वयात ते स्वतःला विद्यार्थी कसे म्हणवून घेतात, हे मला समजत नाही," असे कंगनाने म्हटले.

तिने पुढे स्वतःच्या कारकिर्दीचा उल्लेख करत लिहिले की, "मी गेल्या २० वर्षांपासून सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. तुझ्या वयात माझ्या नावावर दोन राष्ट्रीय पुरस्कार होते. गेल्या दोन वर्षांपासून मी राजकारणात आहे. त्याचबरोबर मी अभिनेत्री, चित्रपट निर्माती, पटकथा लेखिका आणि उद्योजिकाही आहे. त्यामुळे खासदार म्हणून कामाचा ताणही मोठा आहे."

यानंतर कंगनाने सौरव दास यांच्यावर अधिक कठोर शब्दांत निशाणा साधला. "त्यांच्यासारखी पूर्णपणे निरुपयोगी आणि बेरोजगार व्यक्ती कधीच समजू शकत नाही की प्रत्येक वयोगटात आणि प्रत्येक काळात 'हाय डिमांड'मध्ये असण्याचा अर्थ काय असतो. डियर सौरव, तुझ्या समस्या वैयक्तिक आहेत. तू विद्यार्थी नाहीस, तर केवळ निरुपयोगी आहेस. आधी एखादी कला किंवा कौशल्य शिक," असेही तिने म्हटले.

दरम्यान, हा वाद NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनंतर CJP ने केलेल्या आंदोलनानंतर अधिक चिघळला. सुमारे ३६ दिवस चाललेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

याआधी कंगनाने 'Gen Z' पिढीवर टीका करत त्यांना "गटर" असे म्हटले होते. तसेच या पिढीवर अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान आणि अनियंत्रित शारीरिक संबंध ठेवत असल्याचे आरोप केले. त्यावर सौरव दास यांनी ANI शी बोलताना, "कंगना रणौत यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोकच गांभीर्याने घेत नसतील, तर Gen Z ने त्यांना का घ्यावे?" असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर आता कंगनाने सोशल मीडियावरून दिलेल्या प्रत्युत्तरामुळे दोघांमधील हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

छातीत वारंवार दुखत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका; हा असू शकतो हार्ट अटॅकचा धोका

Manoj Jarange: २९ ऑगस्टला मनोज जरांगेंचे निर्णायक आंदोलन, फडणवीस सरकारपुढे ठेवल्या १० मागण्या?

SCROLL FOR NEXT