Young Poo in K3G Engagement Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Malavika Raj Get Engaged: ‘कभी खुशी कभी गम’ फेम अभिनेत्रीने परदेशात गुपचूप उरकला साखरपुडा, अभिनेत्रीचे रोमँटिक फोटो व्हायरल

Malavika Raj And Boyfriend Pranav Bagga Engagement News: ‘कभी खुशी कभी गम’ फेम अभिनेत्री मालविका राजने परदेशात गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

Chetan Bodke

Young Poo in K3G Engagement Photos: सध्या अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींच्या रिलेशनची कमालीची चर्चा सुरू आहे. अशातच आणखी एका अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी खुशी कभी गम’मधून अभिनेत्री मालविका राज कमालीची चर्चेत आली आहे. करण जोहरने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाची आज ही प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ आहे.

चित्रपटात पूजा हे पात्र साकारलेल्या मालविका राजने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ती लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करत असल्याची माहिती दिली आहे.

‘कभी खुशी कभी गम’ फेम अभिनेत्री मालविकाने फोटो शेअर करत तिने साखरपुडा केल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने बिझनेसमॅन प्रणव बग्गासोबत साखरपुडा केला आहे. साखरपुड्याचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, “आम्ही सध्या टर्कीतल्या कॅपाडोशियामध्ये आहोत. आम्ही इथे नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. खूप दिवसानंतर ती वेळ आली आहे, आम्ही त्या करीताच भेटलोय.”

शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री मालविका राजने सुंदर आणि पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला. तर पती आणि बिझनेसमॅन प्रणव बग्गाने देखील पांढरा रंगाचा साधा शर्ट आणि पॅन्ट घातली आहे. दोघांनीही एकमेकांना मॅचिंग ड्रेस घातल्यामुळे जोडा खूपच सुंदर दिसून येत आहे. मालविका-प्रणवने भारतात साखरपुडा केला नाही तर, टर्कीतल्या कॅपाडोशियामध्ये त्यांनी साखरपुडा केला.

मालविकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर,‘झी-५’ (Zee 5) वर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्क्वाड’ चित्रपटात ती शेवटची दिसली होती. जरी ही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असला तरी, प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला नव्हता. सध्या मालविका अभिनय क्षेत्रात सक्रिय नसून मॉडेलिंगक्षेत्रात सक्रिय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

SCROLL FOR NEXT