Nora Fatehi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi: नोरा फतेहीचा भरसमुद्रात 'हाय गर्मी'वाला जलवा; VIDEO पाहून म्हणाल, तुफान आलंया

चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका रीलमध्ये नोराने आपल्या वाढदिवसाच्या काही खास क्षणांना उजाळा दिला.

Chetan Bodke

Nora Fatehi Viral Dance: बॉलिवूडची आयटम गर्ल अभिनेत्री नोरा फतेही सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. नोराने तिचा 31 वा वाढदिवस तिच्या मित्रांसोबत दुबईतील एका यॉटवर साजरा केला. त्यावेळी नोराने आपल्या मित्रांसोबत काही गाण्यांवर ठेका देखील धरला. नोराच्या वाढदिवसाच्या अल्बममध्ये सेलिब्रेशन, बेली डान्स, डिनर पार्टी आणि बरेच काही आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका रीलमध्ये, नोराने आपल्या वाढदिवसाच्या काही खास क्षणांना उजाळा दिला. यावेळी आपल्या मित्रांसोबत नोराने तिच्या मित्रांसोबत जल्लोष करत असताना तिने बेली डान्सवर देखील ठेका धरला होता. फ्लोरल प्रिंटेड को-ऑर्डर सेटमध्ये अभिनेत्री जबरदस्त दिसते. व्हिडिओच्या शेवटी, ती तिच्या मित्रांनाही आमंत्रित करते आणि त्यांच्यासोबत काही हुक्स स्टेप्स करताना ती दिसते.

पोस्ट शेअर करत नोराने सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिले की, "मी लक्ष देण्याचा प्रयत्न केला पण लक्ष माझ्या #birthdaybehavior ने सर्वांचेच लक्ष वेधले." नोरा फतेहीने तिच्या सोशल मीडियावर बर्थडे सेलिब्रेशनचे खास क्षण शेअर केले आहेत. नोरा फतेहीने तिच्या वाढदिवसाचा पुरेपूर आनंद लुटला कारण यॉट पार्टी करत, अभिनेत्री तिच्या मित्रांसह डिनर डेटला बाहेर पडली.

व्हिडिओमध्ये, ती एका रेस्टॉरंटमध्ये बसलेली दिसत असून केक देखील कापताना दिसून येत आहे. डिनर पार्टीसाठी, नोराने नेकलाइनसह काळ्या रंगाच्या ड्रेसची निवड केली होती. यावेळी तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले होते.

नोरा फतेही नेहमीच आपल्या दमदार नृत्य शैलीमुळे सर्वत्र चर्चेत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, तिने कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 च्या समारोप समारंभात परफॉर्म केले होते. 'लाइट द स्काय' या गाण्यासाठी ती रहमा रियाद, बलकीस आणि मनालसोबत सहभागी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

"दीदी, मला मदतीची गरज" दहावीच्या मुलीचा पुणे पोलिसांना फोन, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

Anagha Atul: भरपावसात साडी नेसून अनघा अतुलचं बोल्ड फोटोशूट, Photos

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

SCROLL FOR NEXT