Mangal Dhillon Passed Away Facebook
मनोरंजन बातम्या

Mangal Dhillon Dies: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

Mangal Dhillon Death: मंगल ढिल्लन यांचे उपचारादरम्यान निधन.

Pooja Dange

Actor, Producer, Director Mangal Dhillon Passed Away : टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेता मंगल ढिल्लन यांचे निधन झालं आहे. ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या जवळच्या मित्रांनी सांगितले की, ते सुमारे एक महिना लुधियाना येथील कर्करोग रुग्णालयात दाखल होता. जिथे त्याच्यावर उपचार सुरू होते.

रिपोर्ट्सनुसार त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेता यशपाल शर्मा यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. फेसबुक पोस्टद्वारे करत त्यांनी मंगल आपल्यातून गेल्याचे सांगितले आहे.

मंगल यांनी रेखाच्या 1988 मध्ये आलेल्या 'खून भरी मांग' चित्रपटात कॅमिओ केला होता. 18 जूनला मंगल यांचा वाढदिवस आहे. (Latest Entertainment News)

मंगल ढिल्लन पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले. एवढेच नाही तर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले. पंजाबमधील फरीदकोट येथील रहिवासी होता.

त्यांचा जन्म फरीदकोट जिल्ह्यातील वांडर जटाना गावात शीख कुटुंबात झाला. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण पंज ग्रामीण कलान सरकारी शाळेत झाले. त्यानंतर ते वडिलांसोबत उत्तर प्रदेशला वास्तव्यास गेले.

हायस्कूल पूर्ण केल्यानंतर मंगल ढिल्लन पंजाबला परतले. पदवीनंतर, त्यांनी दिल्लीत थिएटरमध्ये काम केले आणि 1979 मध्ये पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे भारतीय नाट्य विभागात प्रवेश घेतला आणि 1980 मध्ये अभिनयाचा डिप्लोमा पूर्ण केला.

मंगल ढिल्लनला पहिला ब्रेक 1986 मध्ये मिळाला. तेव्हा त्यांनी कथा सागर या टीव्ही मालिकेत काम केले. पण त्याचवर्षी आलेल्या बुनियाद या लोकप्रिय मालिकेतून त्यांना ओळख मिळाली. यानंतर त्यांनी किस्मत, द ग्रेट मराठा, मुजरिम हाजीर, रिश्ता मौलाना आझाद, नूरजहान यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले.

टीव्ही मालिकेत काम करत असतानाच त्यांना चित्रपटांच्या ऑफर्सही येऊ लागल्या. मंगल ढिल्लन पहिल्यांदा 1988 मध्ये आलेल्या खून भरी मांग या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटामध्ये त्यांनी वकिलाची भूमिका साकारली होती.

याशिवाय घायल औरत, दयावान, आझाद देश के गुलाम, प्यार का देवता, अकेला, दिल तेरा आशिक, दलाल, विश्वात्मा, निशाना यांसारख्या चित्रपटांमध्ये (Bollywood Movie) त्यांनी काम केले. त्यांनी बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. मंगल ढिल्लन 2017 मध्ये आलेल्या तुफान सिंग या चित्रपटात शेवटचे दिसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT