Jui Gadkari Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Jui Gadkari Shared Video: जुईने अनेकदा शुटिंगच्या सेटवरील तिचे किस्से शेअर करत असते. नुकतेच जुईने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जुई गडकरी कायमच चर्चेत असते. जुईने मालिकेतील तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात अनोख स्थान निर्माण केलं आहे. सुरूवातीला जुई पुढचं पाऊल या मालिकेत दिसली. या मालिकेत जुई कल्याणीच्या भूमिकेत होती. मात्र सध्या जुई ठरलं तर मग या मालिकेत काम करते आहे. मालिकेत जुई सायलीच्या भूमिकेतून घराघरात पोहचली आहे. याचदरम्यान, जुईने अनेकदा शुटिंगच्या सेटवरील तिचे किस्से शेअर करत असते. नुकतेच जुईने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्री जुई गडकरी तिच्याविषयीच्या अपडेट देत असते. कधी अभिनयातील गंमती जंमती तर कधी शुटिंग सेटवरील मजेदार किस्से जुई शेअर करत असते. नुकतेच जुईने शुटिंगदरम्यानच्या मधल्या वेळात ती काय करते याबद्दल सांगितलं आहे.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जुई लुडो हा खेळ खेळताना दिसत आहे. म्हणजेच जुईने सांगितलं की शुटिंगच्या दरम्यान मधल्या वेळात ती एकटीच लुडो हा खेळ खेळत असते. जुईने मजेशीर खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या जुईच्या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी देखील गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तिने एका टेबलवर लूडो गेम ठेवला आहे, त्यावर तिने ठिपक्यांचा ठोकळा फिरवला तेव्हा पहिल्याच फेरीत ठोकळा सहा ठिपक्यांचा पडला. त्यामुळे ती आनंदी झाली आणि नंतर स्वत: एकटीच निळ्या रंगाच्या सोंगट्यांसह लूडो गेम खेळू लागली. व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच…. डीओपींनी मला ऐ पोरी… अशी हाक मारली आणि ते नेहमी मला असेच म्हणतात आणि मी सध्या एकाच रंगातले लूडो खेळतेय”, असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीदेखील यावर अनेक कमेंट केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT