Jitendra Joshi Visited Landan With Daughter Reva Saam TV
मनोरंजन बातम्या

Jitendra Joshi Share Video With Daughter: जितेंद्र जोशीची लेकीसोबत परदेशवारी; शेक्सपियरच्या देशाला दिली भेट

Jitendra Joshi Share Video: जितूने नुकताच सोशल मीडियावर त्याची मुलगी रेवासोबतचा एक क्युट व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Pooja Dange

Jitendra Joshi Visited London With Daughter Reva: जिंतेद्र जोशी अभिनेता, दिग्दर्शक म्हणून आपल्या भेटीला येत असतो. आता त्याच एक नवीन रुप पाहायला मिळालं आहे. त्याने त्याच्या मुलीसोबतचा एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे.

जितेंद्रने 'व्हेंटिलेटर' चित्रपटात बापाला वाचवण्यासाठीची धडपड पाहून प्रत्येक प्रेक्षक हा रडला असेल. चित्रपट पाहून प्रत्येकाने आपल्या बाबांना मिठी नक्कीच मारली असेल. असा हा जितू खऱ्या आयुष्याचही एक बापमाणूस आहे. (Latest Entertainment News)

जितूने त्याच्या मुलीचा एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे.

जितूने नुकताच सोशल मीडियावर त्याची मुलगी रेवासोबतचा एक क्युट व्हिडिओ पोस्ट केला आहे. मुलीबरोबर विमानातून प्रवास करतानाचा व्हिडिओ जितेंद्र जोशीने शेअर आहे. जितू आणि रेवा दोघेही त्यांच्या या प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहे. बाप-लेकीच्या या व्हिडिओला चाहत्यांनी खूप प्रेम दिले आहे.

जितूने व्हिडिओला सुंदर कॅप्शनही दिले आहे. 'रेवा १३ महिन्यांची असताना मी तिला पहिल्यांदा ट्रिपला घेऊन गेलो होतो. आता ती १३ वर्षाची झाली आहे आणि मी तिली तिच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्रिपला घेऊन जात आहे. हे सर्व माझ्या बायकोमुळे शक्य झालं आहे. मी माझ्या लेकीला शेक्सपियरच्या देशात घेऊन आलोय.' असं म्हणत तो लंडनवारीला गेल्याचं जितूने सांगितलं आहे.

जितू हा खऱ्या आयुष्याचही बापमाणूस आहे. हे त्याने त्याच्या या व्हिडिओतून चाहत्यांना दाखवून दिल आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. जितूच्या या पोस्टवर स्वप्नील जोशीने कमेंट केली आहे की, 'शेक्सपियरच्या देशात तूझ्या कवितेसोबत. अजून काय हवयं! रेवाला खूप सारं प्रेम.' सोनाली कुलकर्णीने म्हटलयं की, 'किती मोठी झाली आहे रेवा. खूप आनंद झाला तिला मोठं झालेल पाहून. खूप सारं प्रेम तुला आणि तुझ्या बाबाला'.

जितूच्या कामाबद्दल बोलायचे तर जितू हा नेहमीच त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकताना दिसत आहे. जितू हा कधी त्याच्या हळव्या अभिनयाने तर कधी कठोर भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करत असतो. त्याच्या गोदावरी या चित्रपटाने अनेक पुरस्करणनी सन्मानित करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Viral monkey Punch: आईनंच चिमुकल्याला दूर केलं; माकडानं शोधली बाहुल्यात मायेची उब

Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात! १४ हजार लिटर पेट्रोल डिझेलचा ट्रक उलटला अन्...

Drinking water after meals: जेवणानंतर लगेच पाणी पिताय? वाचा तुमची ही सवय आरोग्यासाठी किती ठरतेय धोकादायक

Breaking : शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुन्हा रूग्णालयात दाखल करणार

SCROLL FOR NEXT