Jhimma 2 Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rinku Rajguru: 'झिम्मा २' मधील रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वेचा लूक समोर, तुम्ही पाहिलात का?

Jhimma 2 Movie: 'झिम्मा २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rinku Rajguru And Shivani Surve In Jhimma 2:

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे 'झिम्मा'. झिम्मा चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप जास्त प्रतिसाद दिला आहे. या प्रतिसादानंतर झिम्माची टीम पुन्हा एकदा परदेशवारी करायला निघाली आहे. 'झिम्मा २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटामध्ये काही नवीन कलाकार दिसणार आहे. रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे झिम्माच्या या ट्रीपला नव्याने जॉईन होणार आहे.

चित्रपटामध्ये रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे दिसणार आहे. काही दिवसांपासून चित्रपटातील कलाकार चित्रपटाचे पोस्टर, टीझर सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रिंकूने नुकताच चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. रिंकूने फोटो पोस्ट करत सांगता येत नाही ते करायचंच कशाला??? सरळ पण प्रेमळ… झिम्मा २ ची नवी खेळाडू! सुनबाई… तानिया! असे कॅप्शन दिले आहे. चित्रपटात रिंकू राजगुरु निर्मिती सावंत यांच्या सूनेची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये रिंकूची एक झलकही पाहायला मिळली.

रिंकूसोबतच शिवानी सुर्वेदेखील चित्रपटात दिसणार आहे. तिने सोशल मीडियावरुन ही माहिती चाहत्यांना दिली. शिवानी सुर्वे चित्रपटात मनाली हे पात्र साकारत आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत तुम्हा लोकांना वाटतं एखाद्याला काही परवडलं नाही की काय ट्रॅजेडी झाली! बोलणं विषारी पण मन भारी... झिम्मा २ ची नवी खेळाडू! भाचीबाई.. मनाली! असे कॅप्शन दिले आहे. शिवानी सुर्वे सुचित्रा बांदेकरच्या भाचीची भूमिका साकारत आहे.

'झिम्मा २' चित्रपटात रिंकू राजगुरु निर्मिती सावंत यांच्या सूनेची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये रिंकूची एक झलकही पाहायला मिळली. इंदू मावशीच्या वाढदिवसानिमित्त ही नवीन ट्रीप निघणार आहे. झिम्मा २ चित्रपटासाठी प्रेक्षक फार उत्सुक असल्याचे दिसत आहे. झिम्माच्या

२४ नोव्हेंबरला झिम्मा २ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर ही स्टारकास्ट दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Border 2 OTT: बॉर्डर 2 कोणत्या OTT वर पाहता येणार? लगेचच वाचा...

Shocking: मोबाइलची सवय सुटावी म्हणून मुलीला आजोळी पाठवलं, मामा अन् त्याच्या मुलानं केला बलात्कार

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन

Mumbai Pune Expressway : मोठी बातमी! पुण्याहून मुंबईला येणार्‍या सर्व एसटी बसेस रद्द, २१ तासांपासून एक्सप्रेस वे ठप्प, प्रवास टाळाच, कारण...

मी जातपात मानत नाही, माळी समाजाचा उल्लेख; अजितदादांनी मृत्यूआधी कॉलवर नाव घेतलेल्या नेत्याने सगळं काही सांगितलं

SCROLL FOR NEXT