Dolly Sohi Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dolly Sohi Death: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री डॉली सोहीचं निधन, बहिणीच्या मृत्यूनंतर काही तासांतच घेतल अखेरचा श्वास

Priya More

Dolly Sohi Passes Away:

टीव्ही इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोहीचं (Dolly Sohi) निधन झालं आहे. डॉली सोहीला कॅन्सरचे निदान झाले होते. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. पण डॉलीची कॅन्सरसोबतची (Cancer) झुंज अपयशी ठरली. आज सकाळी तिने या जगाचा निरोप (Dolly Sohi Death) घेतल्या. डॉली सोही ४८ वर्षांची होती.

डॉली सोहीच्या कुटुंबाला एकाच वेळी एक नाही तर दोन धक्के बसले. काल रात्री डॉलीची छोटी बहीण अमनदीपचे निधन झाले. अमनदीपला काविळ झाली होती उपचारादरम्यान तिचे निधन झाले. बहिणीच्या निधनाच्या अवघ्या काही तासांमध्येच डॉली सोहीने देखील प्राण सोडले. सध्या डॉली सोहीच्या कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. डॉलीच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. डॉलीचे चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त करत आहेत.

अभिनेत्री डॉली सोही ही गेल्या अनेक महिन्यांपासून गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरशी झुंज देत होती. तिच्यावर उपचार देखील सुरू होते. तर डॉलीची बहीण अमनदीपला काविळ झाली होती. ती देखील काविळसोबत झुंज देत होती. दोघी बहिणींचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यामुळे डॉलीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. डॉलीच्या निधनाची बातमी तिच्या कुटुंबीयांनीच दिली आहे. त्यांनी सांगितले की, आमच्या प्रेमळ डॉलीचे आज सकाळी निधन झाले. तिच्या निधनामुळे आम्हाला धक्का बसला. तिच्या मृतदेहावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉली सोहीची बहीण अमनदीप सोही देखील टीव्ही अभिनेत्री होती. अमनदीपचे गुरुवारी ७ मार्च रोजी रात्री निधन झाले. 'बदतमीज दिल'मधील तिच्या भूमिकेमुळे अभिनेत्रीला खूप लोकप्रियता मिळाली होती. दिवंगत अभिनेत्रीचा भाऊ मनू सोहीने सांगितले की, 'अमनदीपचा कावीळ झाल्याने मृत्यू झाला. त्यानंतर डॉलीचे देखील कॅन्सरमुळे निधन झाले. २०२३ मध्ये डॉलीला गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे निधान झाले होते.

डॉली सोहीने जानेवारीमध्ये खुलासा केला होता की, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे तिला 'झनक' या मालिकेच्या शूटिंगमधून ब्रेक घ्यावा लागला होता. डॉलीने आत्तापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले होते. 'भाभी', 'कलश', 'मेरी आशिकी तुम से ही', 'खूब लडी मर्दानी' आणि 'झांसी की रानी' सारख्या शोमध्ये तिने काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. २ दशकांपासून डॉली टीव्ही मालिकांमध्ये काम करत होती. पण कॅन्सर झाल्यामुळे तिला काम थांबवावे लागले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT