Jaya Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan : एका फोटोसाठी जया बच्चन चाहत्यावर संतापल्या, पाहा व्हायरल VIDEO

Jaya Bachchan Viral Video: जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात त्या एका महिलेवर रागवताना दिसत आहे.

Shreya Maskar

जया बच्चन (Jaya Bachchan) या कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जया बच्चन रागात पाहायला मिळत आहे. 4 एप्रिल 2025 ला मनोज कुमार यांचे निधन झाले. त्यामुळे काल (6 एप्रिल)ला मनोज कुमार यांच्यासाठी मुंबईत प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली. यावेळी जया बच्चन देखील तेथे आल्या होत्या.

जया बच्चन यांचा मनोज कुमार यांच्या प्रार्थना सभेतील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या एका महिला चाहतीवर रागावताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये जया बच्चन या कोणाशी तरी बोलताना दिसत आहेत. जया बच्चन यांची एक चाहती महिला अचानक येते आणि त्यांना हाताने स्पर्श करून बोलावते. तेव्हा जया बच्चन मागे फिरतात आणि तिचा हात पकडून तिला दूर करतात. जया बच्चन तिच्यावर रागवतात.

व्हायरल व्हिडीओत या घटनेनंतर जया बच्चन खूप रागात दिसत आहे. या व्हिडीओवरून जया बच्चन यांना ट्रोल देखील करण्यात आले आहे. ती महिला चाहती जया बच्चन यांच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी आली होती. मनोज कुमार यांच्या प्रार्थना सभाने चाहती फोटो काढण्यासाठी आल्यामुळे जया बच्चन यांना राग अनावर झाला. तर महिलेसोबत उभा असलेला एक पुरूष जया बच्चनचा व्हिडिओ बनवत होता. यामुळे जया बच्चन रागावल्या.

जया बच्चनचे याआधी देखील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात त्या चाहत्यांवर भडकताना, चिडताना पाहायला मिळतात. जया बच्चन यांच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. एका युजरने लिहिलं की, "जया बच्चन कायम लोकांवर रागवतात"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत मोठी कारवाई, 3 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

Drishyam 3 : विजय साळगावकर पुन्हा येतोय! २ ऑक्टोबरला अजय देवगणच्या 'दृश्यम ३'चा थरार, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई

Jammu Kashmir : पहलगाम हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड सूत्रधाराचा खात्मा,सुरक्षा दलांची मोठी कारवाई

Thane News: शिवसेना नेत्याच्या मृत्यू प्रकरणाचा दुसरा VIDEO समोर, गोळीबाराचा आवाज ऐकून पळापळ

Gold Price Today: सप्टेंबरच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठा बदल; १ तोळा कितीला? २४, २२ अन् १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT