Javed Akhtar Buy New Home Saam Tv
मनोरंजन बातम्या

Javed Akhtar X Account Hack : जावेद अख्तर यांचं सोशल मीडिया अकाउंट हॅक, ऑलिम्पिकमधील भारतीय संघाबाबत ट्वीट...

Javed Akhtar's X Account Hacked : सुप्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांचं एक्स अकाऊंट हॅक झालं होतं. हॅकर्सने त्यांच्या अकाऊंटवरून ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेबद्दल पोस्ट शेअर केलेली आहे.

Chetan Bodke

सुप्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कायमच आपलं परखड मत मांडत असतात. अनेकदा त्या परखड मतांमुळे त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आता अशातच जावेद अख्तर यांचं एक्स अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांचं सोशल मिडिया अकाऊंट हॅक झाल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघाबद्दलची पोस्ट रविवारी माझ्या अकाऊंटवरून करण्यात आली होती. ती मी केलेली नाही. असा दावा अख्तर यांनी केला आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत जावेद अख्तर म्हणाले की, "माझं एक्स अकाऊंट हॅक करण्यात आले होते. पॅरिसमध्ये चालू असलेल्या ऑलिम्पिक २०२४ संबंधित भारतीय संघाबद्दल माझ्या अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आलेली होती. ती पोस्ट मी केलेली नसून हॅकरने केलेली होती." ही पोस्ट जावेद यांनी डिलिटही केली आहे.

संबंधित घटनेची तक्रार जावेद अख्तर यांनी एक्सच्या अधिकाऱ्यांकडे केलेली आहे. एक्स पोस्ट शेअर करताच जावेद यांना चाहत्यांकडून पासवर्ड बदलण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. जावेद यांनी अकाऊंट झाल्याची माहिती २८ जुलैला रात्री दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coronavirus : कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला, वटवाघळात ‘क्लेड बी’ विषाणूचा शोध

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमानाचा कहर

Pune : पुण्यात ३० वर्षीय विवाहितेची आत्महत्या; राहत्या घरी घेतला गळफास, कारण अस्पष्ट

Drishyam 3 : अखेर २ ऑक्टोबरचं रहस्य २१ मे ला उलगडणार; 'दृश्यम ३' येतोय, अ‍ॅडव्हान्स बुकिंगला धमाकेदार सुरूवात

Mango Eating Tips: जेवल्यानंतर आंबा खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT