Janhvi Kapoor News Photos During Bawaal Instagram @janhvikapoor
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor Dress : जरा अतिच झालं... जान्हवीचा बोल्डनेस पाहून नेटकऱ्यांनी केला बवाल

Bawaal screening : काल म्हणजे मंगळवारी रात्री 'बावल'चे स्क्रिनिंग पार पडले.

Pooja Dange

Janhvi Kapoor in Bawaal dress : वरुण धवन आणि जान्हवी कपूर लवकरच 'बावल' चित्रपटात दिसणार आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित 'बावल' हा आगामी चित्रपट या महिन्यात (जुलै) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट भारतासह जगभरातील 200 देशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या चर्चेदरम्यान अभिनेत्रीने जान्हवीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर काही यूजर्स तिचे कौतुक करत आहेत तर काही यूजर्स तिला भयंकर ट्रोल करत आहेत. (Latest Entertainment News)

काल म्हणजे मंगळवारी रात्री 'बावल'चे स्क्रिनिंग पार पडले. त्यादरम्यान या चित्रपटातील स्टार्स या स्क्रिनिंगला उपस्थित होते. जान्हवी कपूरने स्क्रीनिंग नाईटसाठी हॉट आणि सेक्सी मेटॅलिक सिल्व्हर मर्मेड गाऊन घातला होता.

तसेच कोणतीही अॅक्सेसरीज घातली नव्हती आणि न्युड मेकअपचा केला होता. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ समोर येताच नेटिझन्सनी तिला ट्रोलकरण्यास सुरुवात केली. तिची प्लास्टिक आणि फॉइलशी तुलना केली. लूकवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, अभिनयावर कमी, पण फिगरवर जास्त लक्ष दिले गेले आहे. एका नेटकाऱ्याने तर तिला 'प्लास्टिक कापूर' म्हटले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना तिसऱ्या नेटिझनने ‘या फॉइल पेपरमध्ये प्लास्टिक कोणी टाकले’, तर चौथ्याने ‘समोर प्लास्टिक, मागे प्लास्टिक, तोंडात प्लास्टिक, सर्व काही प्लास्टिकपासून बनलेले आहे’, असे लिहिले. तर आणखी एका ट्रोलने लिहिले आहे, प्लास्टिक रबर आणि बोटॉक्स.

या चित्रपटांमध्ये दिसणार आहे

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 'NTR 30' व्यतिरिक्त ती अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती राजकुमार रावसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये दिसणार आहे.

जान्हवी वडील बोनी कपूर यांच्या मिली चित्रपटात शेवटची दिसली होती. मिली हा मल्याळम चित्रपट हेलनचा हिंदी रिमेक आहे. हिंदी आणि मल्याळम दोन्ही चित्रपट मथुकुट्टी झेवियर यांनी दिग्दर्शित केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT