Jahnavi Killekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jahnavi Killekar: जान्हवीने बिग बॉसच्या नावाचं घेतलं गिफ्ट, Video शेअर करत म्हणाली...

Jahnavi Killekar Video: बिग बॉस मराठी फेम जान्हवी किल्लेकरने स्वत:साठी वस्तू खरेदी केली आहे.

Manasvi Choudhary

दिवाळीच्या सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. सर्वत्र आनंदी वातावरण असतं. सर्वसामान्यापासून ते सेलिब्रिटी सर्वचजण दिवाळी साजरी करतात. खास दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवनवीन गोष्टी खरेदी केल्या जातात. अशातच बिग बॉस मराठी फेम जान्हवी किल्लेकरने स्वत:साठी वस्तू खरेदी केली आहे.

जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जान्हवीने दिवाळीनिमित्त खास गिफ्ट खरेदी केलं आहे. जान्हवीने स्वत:साठी सोनं खरेदी केलं आहे. खास बिग बॉसचं इव्हिल आय सोन्याचे ब्रेसलेट गिफ्ट जान्हवीने घेतलं आहे.

सोशल मिडिया खास पोस्ट शेअर करत जान्हवीने," आजचा व्हिडीओ बनवण्याचं खास कारण आहे. पाडव्याच्या निमित्तानं मी स्वत:ला एक गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट तसं छोटचं आहे. पण ते माझ्यासाठी खूप खास आहे. बिग बॉस माझ्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत. कारण आज मी जे काही आहे त्यांच्यामुळेच आहे."

जान्हवीने शेअर केलेल्या व्हिडीओवर तुफान प्रतिक्रिया येत आहेत. जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाची स्पर्धक होती. बिग बॉसच्या घरात जान्हवीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. सहा फायनालिस्टमध्ये जान्हवी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT