Pushpa 2 Villain Lead Role saam tv
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Villain Role: आता जाळ अन् धुर संगटच... अल्लू अर्जूनसोबत ‘हा’ कलाकार दिसणार व्हिलनच्या भूमिकेत

चित्रपटात पुष्पा दोन व्हिलनसोबत भिडणार असल्याची माहिती मिळत आहे.

Chetan Bodke

Pushpa 2 Villain Lead Role: अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पुष्पा २’ ची घोषणा झाल्यापासून बरीच चर्चा सुरू आहे. सध्या चित्रपटाची अल्लूच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ दिसून येत आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मिडियावर चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे. पुष्पाचे फॅन्स किती आहेत, हे सांगायची काही गरज नाही. अद्याप चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला नसून प्रदर्शनाची तारीखही अद्याप माहित नसली, तरी ही ‘पुष्पा २’ चित्रपटानं अनेक कोटींची कमाई केली आहे.

सोबतच, मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटात पुष्पा दोन व्हिलनसोबत भिडणार असल्याची माहिती मिळत आहे. या चित्रपटात साऊथ स्टार जगपती बाबूची खलनायक म्हणून एन्ट्री झाली आहे. खुद्द अभिनेत्यानेच याबद्दल माहिती दिली आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘किसी की भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जगपती बाबूने स्वत: या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान याची पुष्टी केली.

चित्रपटाविषयी बोलताना जगपती बाबू म्हणाले, “सुकुमारसोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. अंगावर रोमांचक उभे राहणाऱ्या चित्रपटात पुढे काय होणार हे कोणालाच माहित नाही. मला नेहमीच आव्हानात्मक काम करायला फार आवडतात. सुकुमारने मला चित्रपटात नेहमी उत्तम पात्र साकारण्यासाठी दिले. मला त्याच्यासोबत काम करायला फार आवडते.” (Tollywood)

पुष्पा चित्रपटाविषयी बोलायचे तर, मला चित्रपटाचा पहिला भाग फारच आवडला होता. जगपती बाबूने सांगितले की, अल्लू अर्जुनला मी गेल्या २० वर्षांपासून एका जिममध्ये पाहत आलोय. त्याच्याकडे मी अनेकदा लक्ष दिले आहे. तेव्हा मी त्याला ओळखत नव्हतो, पण आता तो साऊथ फिल्म इंडस्ट्रीत सुपरस्टार आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप गुलदस्त्यात असून हा चित्रपट तेलुगू फिल्म इंडस्ट्रित स्वत:चा एक वेगळाच विक्रम मोडित काढण्याची शक्यता आहे. अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, फहद फासिल हे देखील दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: उन्हात गेल्यावर अचानक BP वाढतोय? वाचा रामबाण घरगुती उपाय

विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार? विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना?

Kokan Top 10 Places: कोकणात फिरायला जात असाल तर ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

Maharashtra News Live Update: नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

SCROLL FOR NEXT