Jacqueline Fernandez and Salman Khan Saam TV
मनोरंजन बातम्या

Jacqueline Fernandez : सलमान-जॅकलीनमध्ये दुरावा, सुकेशसोबतचे नाते आहे कारण ?

जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये अडकल्यामुळे तिच्या खास मित्रांनीही तिला दूर केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) सध्या २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणी जॅकलिनला अनेकदा समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी जॅकलिनची अनेक तास चौकशी केल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकलिन फर्नांडिस कॉनमन सुकेश चंद्रशेखरसोबतही रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, या प्रकरणात केवळ जॅकलिन फर्नांडिसच नाही तर अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. पण आता जॅकलिनचा त्रास काही कमी होत नाही. आता तर तिच्या खास मित्रांनीही तिला दूर केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हापासून जॅकलिन फर्नांडिसचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आले आहे, तेव्हापासून ही जॅकलिनला एकटा पडल्यासारखा वाटत आहे. सुकेश चंद्रशेखरचे नाव सामील झाल्यानंतर तिच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जॅकलीन फर्नांडिस २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कथितपणे जोडली गेल्यानंतर तिच्या बहुतेक मित्रांनी जॅकलिनपासून स्वतःला दूर केले. या मित्रांमध्ये बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचाही(Salman Khan) समावेश आहे. सलमान खाननेही 'किक' अभिनेत्रीपासून योग्य अंतर निर्माण केल्याचे सांगितले जात आहे.

सलमान खान नेहमीच आपल्या मित्रांसोबत कठीण काळात सोबत राहतो, पण जॅकलिन फर्नांडिसच्या बाबतीत भाईजानने तिच्यापासून दूर राहणे योग्य समजले आहे. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, सलमान खान यापुढे कायदेशीर अडचणीत येऊ इच्छित नाही. यावेळी सलमान स्वतःही अनेक न्यायालयीन खटल्यांना सामोरे जात आहे. सलमान खानने जॅकलीन फर्नांडिसला सुकेशसोबत न राहण्याचा सल्लाही दिला होता पण जॅकलिनने त्यावेळी त्याचे एकही ऐकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cloves-Garlic Benefits : रोज खा लवंग-लसूण; हृदयासह मेंदूही राहील तंदुरुस्त, ७ जबरदस्त फायदे वाचाच

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

8th Pay Commission: पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार हे 6 मोठे बदल

Accident News : मुंबई बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात! वाहनांच्या जोरदार धडकेत २ जणांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

Ganpati Festival Rangoli Designs: गणपती स्वागतासाठी सोप्या आणि सुंदर 5 रांगोळ्या, ज्या पटकन होतील

SCROLL FOR NEXT