Bipasha Basu And Karan Singh Saam Tv
मनोरंजन बातम्या

बिपाशा बासू- करण सिंग देणार गूड न्यूज, सोशल मीडियावर चर्चा

बॅालिवूडचे 'हॅाट कपल' अशी ओळख असणारे अभिनेता करण सिंग आणि अभिनेत्री बिपाशा बासू कायमच चर्चेत असतात. लग्न झाल्यापासून हे कपल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॅालिवूडचे 'हॅाट कपल' अशी ओळख असणारे अभिनेता करण सिंग(karan Singh) आणि अभिनेत्री बिपाशा बासू(Bipasha Basu) कायमच चर्चेत असतात. लग्न झाल्यापासून हे कपल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. आता देखील या कपलची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. कारण लवकरच बिपाशा गोड न्यूज देणार असल्याचं बोलंल जात आहे.

माहीतीनुसार, करण सिंग आणि बिपाशा बासू त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या स्वागताची तयारी करत आहेत. दोघेही आई-वडील होणार असल्याने खूप आनंदी आणि उत्साहित आहेत. लग्नाच्या ६ वर्षानंतर बिपाशा आई होणार ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र बिपाशा आणि करणच्या तोंडून ही गोड बातमी ऐकण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु, करण आणि बिपाशा दोघानींही अद्याप या विषयीची अधिकृत घोषणा केली नाही.

'अलोन' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले. त्याचवेळी त्या दोघांची चांगली मैत्री झाली. बघता बघता मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही महिने एकमेकांनी डेट केल्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये या दोघांनी लग्न केले. नुकतीच या कपलच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण झाली आहेत. बिपाशाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लग्नातील गोड क्षणांना उजाळा देत, 'माझ्या चेहरा आणि डोळ्यातील हास्याचे कारण तू आहेस. खूप खूप प्रेम आणि यापुढेही असेच प्रेम...', असे कॅप्शन लिहून करणवरील तिचे प्रेम व्यक्त केले होते. करणनेही त्याच्या लाडक्या पत्नीला लग्नाला ६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या.

दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहेत. करण शेवटचा टीव्ही सीरियल 'कुबूल २.०' मध्ये दिसला होता, तर बिपाशा 'डेंजरस' या चित्रपटात दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT