Munmun Dutta On Israel-Palestine War Instagram
मनोरंजन बातम्या

Munmun Dutta On Israel-Palestine War: तारक मेहतातली बबीता इस्राइलला जाणार होती?, पण एका बदलामुळे थोडक्यात बचावली; इन्स्टा पोस्ट करत मानले देवाचे आभार

Munmun Dutta Instagram Story: टेलिव्हिजन अभिनेत्री मुनमुन दत्त इस्राइलला जाण्याच्या तयारीत होती. पण तिचे काही कारणास्तव जाणे रद्द झाले. अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत देवाचे आभार मानले.

Chetan Bodke

Munmun Dutta On Israel-Palestine War

पॅलेस्टाईनने केलेल्या मिसाईल हल्ल्यानंतर इस्राइलमधील परिस्थिती चिघळली आहे. नागरिकांना जीव मुठीत धरुन तिथे राहावं लागत आहे. इस्राइलच्या या युद्धभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा देखील अडकली होती. ती रविवारी इस्राइलवरून दुपारी भारतात परतली आहे. तिच्यानंतर आणखी एक टेलिव्हिजन अभिनेत्री इस्राइलला जाण्याच्या तयारीत होती. पण तिचे काही कारणास्तव जाणे रद्द झाले. नुकतंच याविषयीची माहिती अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता हिचं दैव बलवत्तर म्हणून ती थोडक्यात बचावली आहे. ती सुद्धा नुसरत प्रमाणेच इस्राइलमध्ये अडकली असती. दरम्यान, याविषयी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत युद्धात अडकण्यापासून कशी थोडक्यात बचावली याबाबात सांगितले आहे.

दरम्यान, मुनमुन स्टोरीमध्ये म्हणते, “सध्या इस्राइलमध्ये होत असलेल्या घटनेचा विचार करुनच माझ्या अंगावर काटा आलाय. इस्राइलला जायचं माझं तिकिटही बुक झालं होतं, पण काही कारणातव माझी ती ट्रीप पुढच्या आठवड्यामध्ये पोस्टपोन झाली. ‘तारक मेहता का...’च्या शुटिंगमध्ये माझे काही सीन्स ॲड झाले आणि माझी शिफ्ट पुढे गेली.”

Munmun Datta Instagram Story

दरम्यान, पुढे अभिनेत्री आपल्या स्टोरीमध्ये म्हणते, “माझी ट्रीप कॅन्सल झाल्यामुळे मला खूपच वाईट वाटंत होतं. पण मला त्याची नंतर जाणीव झाली की, जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं. मी आज माझा जीव गमावू शकले असते. मी माझ्या नशीबाचे कसे आभार मानू, हेच मला कळत नाही. या घटनेमुळे स्पष्ट होतं की देव निश्चितपणे अस्तित्वात आहे आणि जे काही घडतं चांगल्यासाठीच घडतं. मला आशा आहे की इस्रायलमध्ये शांतता व्हावी. जगभर शांतता नांदावी.” मुनमुन दत्ता सध्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT