Ibrahim Ali And Palak Tiwari Relationship Status Instagram
मनोरंजन बातम्या

Palak Tiwari Relationship: सैफ अली खानच्या लेकाला डेट करतेस का? प्रश्नावर पलक तिवारीने दिलं खास उत्तर

Ibrahim Ali And Palak Tiwari Relationship: पलक आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.

Pooja Dange

Palak Tiwari With Ibrahim Ali Khan: टीव्ही अभिनेत्री श्वेत तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. सलमान खानच्या 'किसी की भाई किसी जान' या चित्रपटामध्ये पलक दिसणार आहे. पलकचा हा बॉलिवूड डेब्यू जरी असला तर पलकने याआधी अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. हार्डी संधूसोबतचे तिचे गाणे 'बिजली बिजली' हे खूप हिट झाले होते.

चित्रपट, अभिनय यासह पलक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पलक आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. डिनर डेट आणि इव्हेंटमध्ये दोघे एकत्र दिसले आहेत.

तर इब्राहिम सोबत असताना पलक तिचा चेहरा लपवताना देखील दिसली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या देखील सर्वत्र पसरल्या होत्या.

गेल्या वर्षी पलकला इब्राहिम अली खानसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी दोघेही तोंड लपवताना दिसले. त्यादरम्यान एका मुलाखतीत पलकने सांगितले होते की, ती इब्राहिम आणि तिच्या इतर मित्रांसोबत बाहेर गेली होती.

आईला म्हणजे श्वेता तिवारीला आपण कुठे जातोय हे तिने सांगितले नव्हते म्हणून तिने तिचा चेहरा लपवला होता. आता पलकला पुन्हा एकदा इब्राहिमबाबत प्रश्न विचारण्यात आले.

पलकच्या म्हणण्यानुसार, ती दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती पूर्णपणे तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे आणि हे वर्ष तिच्यासाठी खूप खास असणार आहे. तिला सध्या या अफवांवर बोलण्याची बिलकुल इच्छा नाही, कारण हे सर्व तिच्या कामाशी संबंधित आहे.

पलकला फक्त कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. पलक पुढे म्हणाली, प्रेम कधीच मोजता येत नाही किंवा अंदाज बांधता येत नाही, आता ती फक्त कामात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, विश्वासू शिलेदाराने सोडली साथ

Cancer symptoms risk: कधीही कळून येत नाहीत अशी लक्षणं, वाटतात साधी, पण असतात गंभीर; असू शकतो कॅन्सरचा धोका

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Viral : नवऱ्याची ५००हून अधिक अफेअर्स, वैतागलेल्या बायकोने कॉमिकमधून मांडल्या व्यथा; नेमकं काय प्रकरण? वाचा

Gold Jewellery: सोनार गुलाबी रंगाच्या कागदात सोने गुंडाळून का देतो? यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT