Rashmika Madanna Affairs Instagram
मनोरंजन बातम्या

Rashmika Madanna: ‘या’ सुप्रसिद्ध क्रिकेटरसोबत जोडलं जातय नॅशनल क्रशचं नाव, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असलेल्या रश्मिकाचं भारतीय सुप्रसिद्ध क्रिकेटरसोबत नाव जोडलं जात आहे.

Chetan Bodke

Rashmika Madanna Affairs: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल सध्या आपल्या शानदार कामगिरीमुळे आणि त्याच्या अफेअरच्या बातम्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज गिलचा आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींशी संबंध जोडला गेला आहे. यापूर्वी त्याचे नाव महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी जोडले गेले होते.

यानंतर बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबतही त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आता नॅशनल क्रश म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेली रश्मिका मंदान्नाचं नाव आता शुभमन सोबत जोडले जात आहे.

शुभमन गिल सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) कसोटी मालिकेत व्यस्त आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा फोटो बराच व्हायरल होत आहे. इंस्टाबॉलिवूड या इंस्टाग्राम चॅनलने सोशल मीडियावर शुभमन गिल आणि रश्मिका मंदान्ना यांचा कोलाज फोटो शेअर करताना लिहिले की, 'क्रश अपडेट' रश्मिका मंदाना. यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट त्या पोस्टवर येत आहेत. गिलनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसमोर येत त्या पोस्टमागील सत्य सांगितले.

Rashmika Madanna Affairs

शुभमन गिलने लिहिले की, 'कोणता मीडिया संवाद होता, ज्याबद्दल मला माहितीही नाही.'रश्मिकाची नॅशनल क्रश म्हणून ओळख आहे. २०२२ मध्ये शुभमन आणि सारा अली खानच्या रिलेशनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी दोघांचा हॉटेलमधून बाहेर पडतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

यापूर्वी दोघांनीही फ्लाइटमध्ये एकत्र प्रवास केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, मात्र दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

Rashmika Madanna Affairs

नुकतेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या शुभमन गिलने अहमदाबाद येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात धडाकेबाज शतक झळकावले. गिलच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे.

केएल राहुलच्या जागी त्याला संघात संधी मिळाली. गिलने दोन्ही हातांनी ही संधी साधली. गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोल्यात धक्कादायक निकाल; भाजपचे ५० नगरसेवक विजयी; काँग्रेस, वंचित अन् ठाकरेसेनेला किती जागा? पाहा आकडेवारी

Chandrapur Election: पाच आमदार असूनही चंद्रपुरात भाजप फेल; काँग्रेसचा दणदणीत विजय

बारामतीत बसपाचा 'हत्ती' सुसाट; अवघ्या २१ वर्षांची तरुणी नगरसेवक बनली

India Vs Pakistan: दुबईत अंडर-19 आशिया कप फायनलमध्ये भारत-पाकिस्तान खेळाडूंमध्ये तुफान वाद, नेमकं काय घडलं? वाचा प्रकरण...

Konkan Tourism : रत्नागिरीत लपलाय सुंदर किनारा, अनुभवाल कोकणातील अस्सल सागरी सौंदर्य

SCROLL FOR NEXT