Natasa Stankovic Income Source Saam Tv
मनोरंजन बातम्या

Natasa Stankovic Net Worth: हार्दिक पंड्याच्या बायकोचा थाटच न्यारा, लग्न करून करियरला रामराम केले तरी कमावते कोट्यवधी

Hardik Pandya Wife Natasa Stankovic Property: हार्दिक पेशाने क्रिकेटर आहे, तर नताशा पेशाने अभिनेत्री आहे. तिने लग्नानंतर अभिनयक्षेत्राला रामराम केला आहे. पण तरीही ती कोट्यवधींची मालकीण आहे.

Chetan Bodke

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) क्रिकेट लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही तो चर्चेत असतो. हार्दिक आणि नताशा सध्या आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक (Natasa Stankovic) घटस्फोट घेणार आहेत. त्यांच्या संसारात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिक पेशाने क्रिकेटर आहे, तर नताशा पेशाने अभिनेत्री आहे. तिने लग्नानंतर अभिनयक्षेत्राला रामराम केला आहे. पण तरीही ती कोट्यवधींची मालकीण आहे.

सोशल मीडियावरून नताशाने दोघांचेही फोटो डिलीट केल्यामुळे, आडनाव हटवल्यामुळे सध्या त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होत आहे. नताशा पेशाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने 'डिजे वाले बाबू मेरा गाणा चलादो ' या गाण्यामुळे भारतात प्रसिद्ध झाली. तिच्यासोबत या गाण्यामध्ये, रॅपर बादशाह ही होता. हार्दिक आणि नताशाने २०२० मध्ये लग्नगाठ बांधली आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्याग्रह’मधून नताशाने बॉलिवूड डेब्यू केले होते. त्यानंतर ती ‘बिग बॉस ८’मध्ये सहभागी झाली होती. यासोबतच ती दुसऱ्या कार्यक्रमांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

पण, नताशा बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख प्रस्थापित करू शकली नाही. लग्नानंतर नताशाने फिल्म इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला. पण तरीही ती कोट्यवधींची मालकीण आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नताशाकडे २० कोटींच्या आसपासची संपत्ती आहे. पण असं असलं तरीही ती जाहिरात आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून कोट्यवधी कमावते. नताशा अतिशय आलिशान लाईफस्टाईल जगते. तिच्या कपडे, ज्वेलरी आणि हँड बॅगची किंमतही खूप जास्त असते. मीडिया रिपोर्टनुसार, नताशाच्या हँड बॅगची किंमत जवळपास दीड लाख रुपये इतकी आहे. त्यासोबतच तिच्या सँडल्स, स्निकर्स आणि फॅन्सी शूजचीही किंमत खूप जास्त आहे. कायमच तिच्या फॅशनची चर्चा होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

SCROLL FOR NEXT