Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

हार्दिक पांड्याची एक्स वाइफ नताशा Bigg Boss 18 मध्ये जाणार? मोठी गुपितं उलगडणार?

Natasa Stankovic : बिग बॉस सीझन 18 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये अनेक मोठ्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. भारतीय क्रिकेटपटूची एक्स वाइफ देखील या शोची भाग होणार आहे.

Shreya Maskar

बिग बॉस 18 (Bigg Boss 18 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते शोचे उत्सुकतेने वाट पाहत आहेत. भाईजान शो होस्ट करणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून या बिग बॉस 18 सिझनला सुरूवात होणार आहे. तसेच अनेक स्पर्धकांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत. हा सीझन मनोरंजनाचा धमाका असणार आहे. यासाठी शोचे निर्माते मोठ्या कलाकारांशी संपर्क साधत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आता बिग बॉसने भारतीय क्रिकेटपटूच्या एक्स वाइफला संपर्क साधला आहे.

बिग बॉस 18 मध्ये भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) एक्स वाइफ नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) दिसणार आहे. तसेच असे ही बोले जात आहे की, नताशा बिग बॉसमध्ये एकटी येत नसून तिचा मित्र अलेक्झांडर ॲलेक्स देखील शोमध्ये झळकणार आहे. नताशा आणि अलेक्झांडर (Alexander) बिग बॉस घरात काय कमाल दाखवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे. 5 ऑक्टोबरपासून हा शो तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

नताशाची बिग बॉस घरात एन्ट्री झाली तर हार्दिक सोबतच्या तिच्या नात्यावर अनेक खुलासे होतील. तसचे अलेक्झांडर आणि नताशाचे नक्की नातं काय, याचा उलगडा होईल. असे प्रेक्षकांना वाटत आहे. त्यामुळे प्रेक्षक बिग बॉसची आतुरतेने वाट पाहत आहेत. नताशा घरात येऊन नवीन कोणता वाद घालणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. नताशा स्टॅनकोविकने ही या आधीही बिग बॉसची भाग होती. तिने बॉस सीझन 8मध्ये सहभाग घेतला होता. परंतु तिला त्या सीझनमध्ये यश मिळाले नाही. ती बिग बॉस घरातून लवकर बाहेर पडली. या सीझनमध्ये अनेक जुने स्पर्धक पुन्हा नव्याने बिग बॉस 18 मध्ये दिसणार असल्याची शक्यता आहे. कारण यंदा बिग बॉस 18ची थीम 'टाइम ट्रॅव्हल'आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Babies constipation: थंडी वाढली की बाळांना का होतं कॉन्स्टिपेशन? तज्ज्ञांनी सांगितली कारणं आणि सोपे उपाय

भावी शिक्षकांना मोठा दणका; TAIT परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरचा स्फोट

Silver Mangalsutra Design: तुमच्या लाडक्या बायकोला द्या हे फॅन्सी मंगळसूत्र, बघताच क्षणी प्रेमाने करेल कौतुक

बापरे! बदलापूरच्या आंबेशिवमध्ये दोन-दोन बिबटे; भरदुपारी कुत्र्याची शिकार केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT