Sai Tamhankar On Marathi Film Audience Instagram
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar On Marathi Film Audience: ‘माझ्यावर रुसलास का रे?...’ म्हणत सई ताम्हणकरने प्रेक्षकांसमोर व्यक्त केली मनातील खंत

Sai Tamhankar In Khupte Tithe Gupte: सईने अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या शो मध्ये खासगी आयुष्यातील मुद्द्यांवर, सिने सृष्टीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवरही तिने भाष्य केलं आहे.

Chetan Bodke

Sai Tamhankar On Marathi Film Audience: मराठी टेलिव्हिजनसृष्टीत सई ताम्हणकरची नेहमीच आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. सई अनेकदा तिच्या अभिनयाकरिताच नाही तर, फॅशन करिता ही ती अनेकदा चर्चेत असते. नुकतच सईने अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या शो मध्ये तिने हजेरी लावली होती.

यावेळी तिने अनेक आपल्या खासगी आयुष्यातील मुद्द्यांवर, सिने सृष्टीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवरही तिने भाष्य केलं आहे. सध्या सईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तिने मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना फोन लावला आहे.

‘खुपते तिथे गुप्ते’ या शो मध्ये आलेल्या मान्यवराला एक काल्पनिक फोन लावायचा असतो. या काल्पनिक फोनमध्ये आपल्या मनातले विचार त्यांना मांडायचे असतात. गेल्या रविवारी झालेल्या एपिसोडमध्ये सईने मराठी चित्रपट बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला फोन करण्याची तिने इच्छा व्यक्त केली. प्रेक्षकांसोबत फोनवर बोलताना सईने भावुक शब्दात संवाद साधला. तिने संवाद साधलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ झी मराठीच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडीओला,‘सईला प्रेक्षकांना काहीतरी सांगायचंय’ अशा आशयाचे कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओत सई म्हणते, “हाय कसा आहेस? तू आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुला धन्यवाद म्हणेल. सदिच्छांबद्दल आणि मला सर्वस्वी स्वीकारुन मी जिथपर्यंत पोहोचलीय, तिथपर्यंत पोहोचवण्याबद्दल. पण गेली दोन-चार वर्ष मला असं वाटतंय की तू रुसलास बाबा… काय कारण आहे? मला माहित आहे, आता तुझे नवीन मित्र झाले आहेत, आणि ते सर्व एकदम नवखे मित्र आहेत. त्यांच्यासोबत तू जास्त असतोस. म्हणून तू जुन्या मित्रांना विसरणार आहेस का? तुही मला आज एक प्रॉमिस कर, तू तुझा रुसवा-फुगवा विसरुन तू पुन्हा येशील.”

दरम्यान, सईचा हा भावनिक संवाद ऐकून सर्वच प्रेक्षक भावनिक झाले आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून प्रेक्षकांनी सईच्या या व्हिडीओवर तुफान लाईक्स करत प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

‘खुपते तिथे गुप्ते’च्या येत्या आगामी एपिसोडमध्ये एनसीबीचे माजी संचालक IRS समीर वानखेडे हजेरी लावणार आहेत. येत्या रविवारी ६ ऑगस्ट रोजी आगामी एपिसोड प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT